शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: भारतात हवाई उद्योगातील २९ लाख रोजगार संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 05:58 IST

सरकारने तातडीने या विमान कंपन्यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी पुरेशी रोख रक्कम ओतली नाही, तर आणखीही काही कंपन्या बंद पडण्याची भीती आहे.’

कोरोना विषाणूच्या (कोविड−१९) उद्रेकामुळे जगभरातच विमान उद्योग बंद पडल्यासारखा असून, भारतात यावर्षी या उद्योगातील २९.३२ लाखरोजगार संकटात सापडले आहेत, असे इंटरनॅशनल एअर ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने (आयएटीए) म्हटले. आयएटीएचे विभागीय उपाध्यक्ष (आशियापॅसिफिक ) कॉनरॅड क्लिफोर्ड यांनी म्हटले की, ‘या भागातील विमान कंपन्यांचा २०२० च्या दुसऱ्या तिमाहीत ६१ अब्ज डॉलर्सचा रोखीचा व्यवहार झालाच नाही. या भागात आम्ही पहिल्या विमान कंपनीचा बळी गेल्याचे पाहिले. सरकारने तातडीने या विमान कंपन्यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी पुरेशी रोख रक्कम ओतली नाही, तर आणखीही काही कंपन्या बंद पडण्याची भीती आहे.’क्लिफर्ड यांनी भारत, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, श्रीलंका आणि थायलंड या देशांनी प्राधान्याने कृती करण्याची गरज असल्याचे सांगितले. कोविड−१९ साथीमुळे जगातील विमान कंपन्यांचा प्रवासी महसूल २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ५५ टक्क्यांनी म्हणजे ३१४ अब्ज डॉलर्सने घसरलेला असण्याची अपेक्षा आहे. आशिया पॅसिफिकमधील विमान कंपन्यांचा महसूल गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी सर्वात जास्त म्हणजे ११३ अब्ज डॉलर्सने खाली आलेला असेल.>महसुलात होईल घटआशिया पॅसिफिक देशांत भारतीय विमान उद्योगाला नोक ऱ्यांचा विचार करता फारच मोठा फटका बसेल, असे आकडेवारी सांगते. यामुळे २९लाख ३२ हजार ९०० नोक-यांवर परिणाम होईल, असे आयएएटीएच्या अहवालात म्हटले. भारताचा या क्षेत्रातील महसूलही २०१९ च्या तुलनेत ११.२२१ दशलक्ष डॉलर्सने खाली आलेला असेल. याशिवाय प्रवाशांची मागणीही भारतात ४७ टक्क्यांनी खाली येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या