२८ पाणी योजनांप्रकरणी गुन्हे दाखल होणार कार्यकारी अभियंत्यांची कमिटी गठीत करणार : गुडेवारांच्या अहवालाच्या आधारे तथ्य तपासणार
By admin | Updated: November 27, 2015 21:32 IST
जळगाव- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जिल्ात विविध गावांमध्ये भारत निर्माण, पेयजल आपूर्ती, जलस्वराज आदी योजनांमधून घेण्यात आलेल्या २८ पाणी योजनांच्या संदर्भात जि.प.प्रशासन बाहेरील तांत्रिक व्यक्तींची नियुक्ती करून पुन्हा चौकशी करणार असून, तथ्य आढळल्यानंतर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी लोकमतशी बोलताना दिली.
२८ पाणी योजनांप्रकरणी गुन्हे दाखल होणार कार्यकारी अभियंत्यांची कमिटी गठीत करणार : गुडेवारांच्या अहवालाच्या आधारे तथ्य तपासणार
जळगाव- जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जिल्ात विविध गावांमध्ये भारत निर्माण, पेयजल आपूर्ती, जलस्वराज आदी योजनांमधून घेण्यात आलेल्या २८ पाणी योजनांच्या संदर्भात जि.प.प्रशासन बाहेरील तांत्रिक व्यक्तींची नियुक्ती करून पुन्हा चौकशी करणार असून, तथ्य आढळल्यानंतर गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी लोकमतशी बोलताना दिली. लोकमतने पाणी योजनांच्या प्रकरणात जि.प.तर्फे कार्यवाही केली जात नाही. तसेच या योजनांमध्ये कोट्यवधींचा अपहार झाल्याचा मुद्दा समोर आणला. या प्रकरणातील तक्रारदार, कायदेशीर कार्यवाही, लोकप्रतिनिधींची भूमिका काय आहे या मुद्द्यांचा उलगडा केला. यानंतर जि.प.प्रशासनाने दोषींवर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. गुडेवारांच्या चौकशी अहवालाचा आधारतत्कालीन उपायुक्त (विकास) चंद्रकांत गुडेवार यांनी जि.प.तर्फे राबविलेल्या ९४ पाणी योजनांप्रकरणी चौकशी केली होती. पैकी ३१ पाणी योजनांमध्ये अपहार झाल्याचा अहवाल गुडेवार यांनी चौकशीअंती जि.प.ला सादर केला होता. त्यात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून वसुली करावी, असे गुडेवार यांनी अहवालात म्हटले होते. पण अजून फक्त कल्याणेहोळ, सोनवद खुर्द आणि वाघळूद खुर्द पाणी योजनांप्रकरणी दोषींविरुद्ध गुन्हे दाखल झाले. इतर २८ योजनांप्रकरणी गुन्हे दाखल झालेले नाहीत. या २८ योजनांच्या संदर्भातही गुन्हे दाखल करण्याची तयारी जि.प.प्रशासनाने सुरू केली आहे. तांत्रिक माहितीची गरजगुन्हे दाखल करताना कुणावर हकनाक कारवाई होऊ नये यासाठी जि.प.प्रशासन पुन्हा एकदा २८ योजनांसंबंधी चौकशी करून घेणार आहे. जि.प.तील कार्यकारी अभियंता व बाहेरील तांत्रिक माहिती असलेल्या तज्ज्ञांची मदत घेऊन संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल केले जातील, असेही पांडेय म्हणाले. ३ डिसेंबरपर्यंत समिती गठीतसध्या जि.प.त मेगा भरती सुरू आहे. त्यात प्रशासनातील सर्वच वरिष्ठ अडकले आहेत. यामुळे ३ डिसेंबरपर्यंत समिती गठीत होईल व पुढील कार्यवाही सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. महसूलमंत्र्यांशी चर्चाअपहार झालेल्या ३१ योजनांच्या संदर्भात महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी सायंकाळी जि.प.चे सीईओ पांडेय, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता एस.बी.नरवडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यात खडसे यांनी गुडेवार समितीचा अहवालाचा आधार घेऊन व तांत्रिक मुद्दे तपासून योग्य ती कारवाई करावी, अशी सूचना जि.प.प्रशासनाला दिल्याचे सीईओ पांडेय म्हणाले.