27 वर्षांच्या व्यक्तीनं गेम खेळून कमावले 70 कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 07:22 PM2019-01-03T19:22:49+5:302019-01-04T09:41:17+5:30

बऱ्याचदा मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या माध्यमातून गेम खेळणं आता फक्त शिल्लक वेळा घालवण्याचं एक साधन समजलं जातं.

27 year old person earned Rs. 70 crores from playing the game | 27 वर्षांच्या व्यक्तीनं गेम खेळून कमावले 70 कोटी रुपये

27 वर्षांच्या व्यक्तीनं गेम खेळून कमावले 70 कोटी रुपये

googlenewsNext

नवी दिल्ली- बऱ्याचदा मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर इंटरनेटच्या माध्यमातून गेम खेळणं फक्त शिल्लक वेळ घालवण्याचं एक साधन समजलं जातं. परंतु आता व्यवसायासाठीही या गेमचा वापर केला जातोय. अनेक जण PUBG गेम खेळून पैसे कमावत आहेत. यू ट्युबवर असे अनेक चॅनेल्स आहेत, ज्यावर पबजी गेम खेळला जातो आणि गेम खेळताना पाहून लोक पैसे दान करतात.

पबजी भारतात एवढा प्रसिद्ध नसला तरी अमेरिकेत त्याचं प्रचंड वेड आहे. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार, 27 वर्षांचा निंजा नावाच्या एका व्यक्तीनं पबजी गेम खेळून 2018मध्ये 10 मिलियन डॉलर(जवळपास 70 कोटी रुपये) कमावले आहेत. यासाठी त्यानं YouTube आणि Twitchचा आधार घेतला आहे. निंजा हा गेमिंग जगतातला नावाजलेला चेहरा आहे. त्याचं पूर्ण नाव टायलर ब्लेविन्स आणि तो निंजा हे युजरनेम वापरतो. वर्ष 2018मध्ये Twitchवर स्ट्रीमरमध्ये निंजा नंबर राहिला आहे.

YouTubeवर त्यांचे 21 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याची पूर्ण कमाई ही यू ट्युब आणि Twitchच्या भागीदारीतून होते. Twitchवर त्याला 12.5 मिलियन लोक फॉलो करतात. यात 40 हजार लोक गेम पाहण्यासाठी पैसे देतात. ज्यांनी सब्सक्रिप्शन मॉडल ठेवलं असून, ज्यात त्यांना 5, 10, आणि 20 डॉलर दर महिन्याला द्यावे लागतात. YouTubeवर निंजा हा पॉप ऍडच्या माध्यमातून पैसे कमावतो. त्याची जास्त करून कमाई ही स्पॉन्सर्डनं होते. सॅमसंग, उबर ईट्स आणि रेड बुलसारख्या कंपन्याही यात सहभागी आहेत. निंजाच्या मते कॉफी शॉपसारखंच पैसे कमावण्याचं बिझनेस शॉप खुलं केलं पाहिजे. 

Web Title: 27 year old person earned Rs. 70 crores from playing the game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.