शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या काळात 27 रेल्वे दुर्घटनेत 259 प्रवाशांचा मृत्यू, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 14:27 IST

काल उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू तर 40  हून अधिक जखमी झाले.

नवी दिल्ली, दि. 20 - काल उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू तर 40  हून अधिक जखमी झाले. काँग्रेसनं या  रेल्वे दुर्घटनेवरुन केंद्र सरकाला अडचणीत पकडले आहे. काँग्रेसनं हाच मुद्दा पकडून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. 2014 ला भाजपा सरकार सतेत आल्यापासून आतापर्यंत 27वी रेल्वे दुर्घटना झाली आहे. भाजपाने रेल्वे दुर्घटनेचा रेकॉर्ड बनवल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. 2014 पासून झालेल्या 27 दुर्घटनेत आतापर्यंत 259 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 899 जण जखमी झाल्याची माहिती काँग्रेसनं दिली आहे. काँग्रेस प्रवाक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत रेल्वे दुर्घटनेचा चांगलाच समाचार घेतला. रेल्वे दुर्घटना होत आहेत आणि लोकांचा जीव जात आहे, हे सरकार कधी जाणार असा प्रश्नही ट्विटद्वारे उपस्थित केला. काँग्रेस प्रवाक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की,  उत्कल एक्स्प्रेस दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियाप्रति शोक संवेदना व्यक्त करतो. मृत पावलेल्या प्रवाशांच्या आत्म्याला शांती लाभो. या अपघातात अनेक निर्दोषांचा मृत्यू झाला. रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुरजेवालाने माध्यमांशी बोलातान सांगितले की, या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियाना सरकार आर्थिक मदत करेल पण पैशांनी त्यांचा जीव परत येणार नाही. सतत घडणाऱ्या या रेल्वे अपघातानां रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे. 

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येतील. तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

उत्कल एक्स्प्रेस अपघातप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम '३०४ ए' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे रुळावर काम सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे, उद्यापासून सुरक्षा आयुक्त घटनेची चौकशी करणार आहे. आज रात्री १० वाजेपर्यंत यांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाSuresh Prabhuसुरेश प्रभूIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी