शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
3
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
4
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
6
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
7
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
8
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
9
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
10
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
11
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
12
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
13
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
14
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
15
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
16
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
17
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
18
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
19
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
20
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

नेपाळमध्ये बस दरीत कोसळली, जळगावच्या २७ भाविकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 06:50 IST

अयाेध्येला रामकथेसाठी गेले हाेते; पुढे देवदर्शनाला जाताना काळाचा घाला

काठमांडू/जळगाव : अयाेध्येला रामकथा आटाेपल्यानंतर नेपाळमध्ये देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांची बस मुसळधार पावसामुळे दुथडी भरुन वाहत असलेल्या नेपाळमधील मर्त्स्यांगडी नदीमध्ये सकाळी ११ वाजता काेसळली. या अपघातात २७ भाविकांचा मृत्यू झाला. तर १६ जण जखमी झाले आहेत. ते जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हाेते. घटनेची माहिती मिळताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे तातडीने घटनास्थळी रवाना झाले.

वरणगाव (भुसावळ) परिसरातील ४१ भाविक १० दिवसांच्या तीर्थयात्रेसाठी गेले हाेते. महाराष्ट्रातून नेपाळमध्ये दाखल झालेल्या १०४ भाविकांमध्ये त्यांचा समावेश हाेता.  काठमांडूला बसने (यूपी५३-एफटी७६२३) जात होते. चालकाचे एका वळणावर नियंत्रण सुटले आणि बस तब्बल १५० फुट खाेल दरीत काेसळली. त्या बसचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. १६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जण उपचारादरम्यान दगावले. बसमध्ये चालक व क्लिनरसह ४३ जण होते. 

पंतप्रधान माेदी यांनी व्यक्त केले दु:खनेपाळमधील अपघाताबद्दल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी शाेक व्यक्त केला. अपघातात भाविकांच्या मृत्यूमुळे दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना, अशा शब्दांत माेदी यांनी भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्राचे पथक पाठवले : मुख्यमंत्रीनेपाळ दुर्घटनेत जळगावचे काही नागरिक मृत्युमुखी पडले. त्यांना योग्य ती मदत राज्य शासनाच्यावतीने पोहोचविली जाईल. त्यांच्या मदतीसाठी आमदार व अधिकाऱ्यांना नेपाळ येथे पाठविले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

१६ मृतांची ओळख पटलीजळगावमधील २७ मृतांपैकी १६ जणांची ओळख पटली आहे. रामजीत ऊर्फ मुन्ना, सरला राणे (वय ४२), भारती जावळे (६२), तुळशीराम तावडे (६२), सरला तावडे (६२), संदीप सरोदे (४५), पल्लवी सरोदे (४३), अनुप सरोदे (२२), गणेश भारंबे (४०), नीलिमा धांडे (५७), पंकज भंगाळे (४५), परी भारंबे (८), अनिता पाटील, विजया जावळे (५०), रोहिणी जावळे (५१), प्रकाश कोळी यांचा समावेश आहे.

बेळी (ता. जळगाव) येथील कुंडलेश्वर संस्थानच्या वतीने अयोध्या (उत्तर प्रदेश) येथे रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कथेसाठी जळगाव आणि तसेच इतर ठिकाणांहून जवळपास १५०० भाविक अयोध्येला गेले होते. सप्ताहाची सांगता झाल्यानंतर वरणगाव, पिंपळगाव, गोळेगाव, तळवेल, आचेगाव आणि भुसावळ येथील काही भाविक नेपाळकडे देवदर्शनासाठी दोन बसमधून रवाना झाले. त्यापैकी एक बस दरीत कोसळली. 

मुख्य सचिवांना आदेश : फडणवीसनेपाळ येथील दुर्घटनेत जळगावच्या नागरिकांचा समावेश आहे. तेथील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून नागरिकांच्या मदतीसाठी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. नेपाळच्या अधिकाऱ्यांशी समन्वय केला असून सगळी मदत देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. यू.पी. सरकारच्या माध्यमातून मृतदेह आणले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मदतकार्यात अडथळे : गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांचा प्रवाह आणखी वेगवान झाला असून बचावकार्य जिकिरीचे झाले आहे.

दूतावासाशी संपर्क : ही घटना कळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केंद्रीय दूतावासाशी संपर्क केला. तसेच, नेपाळच्या सीमेवरील उत्तर प्रदेशच्या  महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. 

टॅग्स :NepalनेपाळAccidentअपघात