२७... गुन्हे
By admin | Updated: March 28, 2015 01:43 IST
बिना येथे घरफोडी
२७... गुन्हे
बिना येथे घरफोडीखापरखेडा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिना येथे घरफोडी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यात चोरट्यांनी एकूण २२ हजार ७५० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. बाबाराव भाऊराव ढोबळे (६१, रा. नवीन बिना) हे गुरुवारी सकाळी घराला कुलूप लावून कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यात चोरट्यांनी २२ हजार ७५० रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले. या प्रकरणी खापरखेडा पोलिसांनी भादंवि ४५४, ३८० अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (प्रतिनिधी)***वारंगा शिवारातील ट्रान्सफॉर्मर फोडलेनागपूर : अज्ञात चोरट्यांनी महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील ६३ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वारंगा शिवारात रविवारी मध्यरात्री घडली.वारंगा शिवारात महावितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर आहे. चोरट्यांनी ते ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील ४० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या क्वाईल आणि इतर साहित्य लंपास केले. या साहित्याची एकूण किंमत ६३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी लाईनमन अशोककुमार कांताप्रसाद गुप्ता (५२, रा. खापरी) यांच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ३७९, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा तपास सहायक फौजदार सयाम करीत आहे. (प्रतिनिधी)***सावनेर शहरातून बोलेरो पळविलीसावनेर : शहरातील महात्मा फुले नगरातून चोरट्यांनी बोलेरो चोरून नेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. हेमंत मुरलीधर अग्रवाल (२९, महात्मा फुले नगर, सावनेर) यांनी त्यांच्या मालकीची एमएच-४०/एन-१३६४ क्रमांकाची बोलेरा नेहमीप्रमाणे घरासमोर उभी ठेवली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ती चोरून नेली. या वाहनाची किंमत तीन लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला असून, सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मेश्राम करीत आहे. (प्रतिनिधी)***