शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्तीसगडमधील गोशाळेत 27 गायींचा मृत्यू, भाजपा नेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 14:03 IST

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गोशाळेत तब्बल 27 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गायींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे गोशाळेचा संचालक हा भाजपाचे नेता असल्याची माहिती समोर आली आहे.

रायपूर, दि. 19 -  छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गोशाळेत तब्बल 27 गायींचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गायींच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे गोशाळेचा संचालक हा भाजपाचे नेता असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनानं याप्रकरणाची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. दुर्ग क्षेत्रचे पोलीस महानिरीक्षक दीपांशु काबरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गायींच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी गोशाळेचे संचालक हरीश वर्मा यांनी अटक केली आहे. छत्तीसगडमधील गौसेवा आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.  गोशाळेत होती प्रचंड अस्वच्छता काबरा यांनी सांगितले की, वर्माविरोधात छत्तीसगड कृषि-पशु संरक्षण कायदा 2004नुसार  द्यानुसार कलम 4 व 6 तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा 1960नुसार 11 आणि भादवि कलम 409 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गौसेवा आयोगाने केलेल्या तक्रारीनुसार गोशाळेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. यामुळे प्रचंड दुर्गंधी व रोगराईदेखील पसरल्याची माहिती समोर आली आहे. दुर्ग जिल्ह्यातील अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील धमधा विकासखंड अंतर्गत येणा-या राजपूर गावातील गोशाळेत गेल्या तीन दिवसांत 27 गायींचा मृत्यू झाला आहे.  

अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 गायींच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर पशु वैद्यांचं पथक घटनेच्या चौकशीसाठी पाठवण्यात आले होते. शिवाय, उपविभागीय दंडाधिका-यांनीही घटनास्थळाचा दौरा केला होता. त्यांनी सांगितले की, चौकशीनंतरच जनावरांच्या मृत्यूचं कारण समोर येईल. तर दुसरीकडे गोशाळेचे संचालक तसेच जामुल नगर पालिकेचे उपाध्यक्ष हरीश शर्मा यांनी सांगितले की, 15 ऑगस्टच्या दिवशी झालेल्या जोरदार पावसामुळे गोशाळेतील 90 फूट लांब भिंत कोसळली होती. या दुर्घटनेत जखमी झाल्याने 27 गायींचा मृत्यू तीन दिवसांत मृत्यू झाला तर अन्य जखमी गायींवर सध्या उपचार सुरू आहेत. 

उपासमारीमुळे गायींचा मृत्यू, काँग्रेसचा आरोप  तर दुसरीकडे विरोधी पक्ष काँग्रेसनं गायींच्या मृत्यूचा मुद्दा उचलून धरत असा आरोप केला आहे की, उपासमारीमुळे गायींचा मृत्यू झाला आहे. छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता आर.पी.सिंह असे म्हणालेत की, स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार चारा व पाणी न मिळाल्याच्या कारणामुळे गायींचा मृत्यू झाला आहे. शिवाय या गोशाळेत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतादेखील आहे, ज्यामुळे आतापर्यंत जवळपास 300 गायींचा मृत्यू झाला आहे. काँग्रेस या मुद्यावरुन भाजपाला टार्गेट करत प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.