शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: कोरोना घुसला नौदलात; ‘आयएनएस आंग्रे’वर २६ नौसैनिक व कर्मचाऱ्यांना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:54 IST

नौदलाच्या कोणत्याही युद्धनौकेवर किंवा पाणबुडीवर कोणालाही कोरोनाची लागण नाही; सूत्रांची माहिती

मुंबई : भारतीय नौदलाच्या मुंबईतील एका तळावर २६ नौसैनिकांना व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या संपूर्ण नौदल आस्थापनात ‘लॉकडाउन’ करण्यात आले आहे. मात्र नौदलाच्या कोणत्याही युद्धनौकेवर किंवा पाणबुडीवर या साथीची कोणालाही लागण झालेली नाही, असे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.सूत्रांनुसार लागण झालेल्यांमध्ये ‘आयएनएस आंग्रे’ या जमिनीवरील नौदल आस्थापनेतील २० नौसैनिक आहेत. आधी ७ एप्रिल रोजी एका नौसैनिकाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली व त्याच्याकडून इतरांना लागण झाली. मात्र लागण झालेल्यांपैकी बहुतेकांना कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत. त्यांना नौदलाच्या ‘आयएनएस अश्विनी’ या इस्पितळात क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. लागण झालेले नौसैनिक ‘बॅचलर्स अकोमोडेशन’मध्ये राहणारे आहेत. त्यांचा इतर ज्यांच्याशी संपर्क आलेला असू शकतो अशांचा शोध घेण्यात येत आहे.फ्रेंच युद्धनौकेवरही १००० जणांना लागणपॅरिस: फ्रान्सच्या नौदलाची ‘चार्लस-डी-गॉल’ ही विमानवाहू आण्विक युद्धनौका अटलांटिक महासागरात तैनातीवर असताना तिच्यावरील १,०८१ नौसैनिक व अन्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे, असे फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनी संसदेत सांगितले.त्यांनी असेही सांगितले की, युद्धनौकेस १० दिवस आधी परत आणण्यात आले. सर्व नौसैनिकांची व कर्मचाºयांची चाचणी घेतली गेली. संसर्ग झालेल्यांमध्ये ५६५ नौसेनिक असून त्यापैकी २४ जणांना इस्पितळात एकाला अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले आहे. इतरांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले.ही युद्धनौका १३ मार्च रोजी फ्रान्सहून रवाना झाल्यापासून तिच्यावरील नौसैनिकांचा बाहेरच्या कोणाशीही संपर्क आलेला नसतानाही एवढ्या मोठ्या संख्येने संसर्ग कसा झाला हे कोडे मात्र अद्याप उलगडलेले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याindian navyभारतीय नौदल