रामपालच्या अटकेवर 26 कोटींचा खर्च

By Admin | Published: November 29, 2014 02:08 AM2014-11-29T02:08:52+5:302014-11-29T02:08:52+5:30

रामपालला अटक करण्यासाठी तब्बल 26 कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली असल्याची आकडेवारी तीन राज्यांच्या सरकारांनी न्यायालयासमोर सादर केली आहे.

26 crores spent on the arrest of Rampal | रामपालच्या अटकेवर 26 कोटींचा खर्च

रामपालच्या अटकेवर 26 कोटींचा खर्च

googlenewsNext
दोन आठवडे चालला संघर्ष : 6 ठार, 200 जण जखमी
चंदीगड : वादग्रस्त स्वयंघोषित संत रामपाल याचा ठावठिकाणा शोधणो आणि त्याला अटक करणो याकरिता राबविलेल्या मोहिमेवर तब्बल 26 कोटींहून अधिक रक्कम खर्च झाली असल्याची आकडेवारी तीन राज्यांच्या सरकारांनी न्यायालयासमोर सादर केली आहे. 
शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात रामपालला न्या. एम.जयपॉल व न्या. दर्शन सिंग यांच्या खंडपीठासमोर उभे करण्यात आले. पीठाने या प्रकरणाची सुनावणी 23 डिसेंबर्पयत स्थगित केली आहे. त्या दिवशी रामपालसह सहआरोपी असलेले रामपाल ढाका व ओ.पी. हुडा यांनाही हजर केले  जाईल.
हरियाणाचे पोलीस महासंचालक एस.एन. वशिष्ठ यांनी रामपालच्या अटकेबाबतचा सविस्तर अहवालही न्यायालयाला सादर केला. याप्रकरणी हरियाणा, पंजाब, चंदीगड प्रशासन आणि केंद्र सरकारने रामपालला पकडण्यासाठी राबविलेल्या मोहिमेवर झालेल्या खर्चाचा हिशेबही न्यायालयासमोर ठेवला. यात हरियाणा सरकारचे 15.43 कोटी, पंजाब सरकारचे 4.34 कोटी, चंदीगड प्रशासनाचे 3.29 कोटी, तर केंद्राचे 3.55 कोटी रुपये खर्च झाले                  आहेत. 
न्यायालयाने हरियाणा पोलीस महासंचालकांना जखमींचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत, तसेच रामपालला अटक करण्याच्या दरम्यान बरवालाच्या सतलोक आश्रमात झालेल्या हिंसक घटनांमध्ये अटक झालेल्या 9क्9 लोकांच्या माहितीची शहानिशा करण्यासही सांगितले आहे.
रामपालचे समर्थक व पोलीस यांच्यादरम्यान दोन आठवडे चाललेल्या या संघर्षानंतर 19 नोव्हेंबर रोजी 63 वर्षाच्या रामपालला अटक करण्यात आली होती. त्याच्या अटकेपूर्वी त्याच्या 15 हजार समर्थकांना आश्रमातून बाहेर काढावे लागले होते. या चकमकीत पाच स्त्रिया व एका बालकाचा मृत्यू झाला, तर 2क्क् हून अधिक लोक जखमी झाले होते. (वृत्तसंस्था)
 
4भोपाळ- हरियाणात अटक झालेल्या रामपाल या कथित संताच्या बैतूल जिल्ह्यातील उडदनमध्ये असलेल्या आश्रमाची तपासणी करण्यासाठी हरियाणा पोलिसांचे एक पथक बैतूलला पोहोचले आहे. बैतूलचे पोलीस अधीक्षक सुधीर लाड यांनी, हरियाणा पोलिसांचे पथक तेथे पोहोचल्याचे सांगितले.
 
4रामपाल याचा आश्रम बैतूलपासून 1क् कि.मी. दूर अंतरावर असलेल्या उडदनमध्ये आहे. हा आश्रम 7क् एकर एवढय़ा भूभागावर विस्तारला असून त्याचे बांधकाम गेल्या 
3-4 वर्षापासून सुरू आहे.
4या आश्रमात 5क् हजार भक्तांच्या बसण्याची सोय असलेला एक विशाल मंडप उभारण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे, तसेच या परिसरात दोन तलाव व एक फिल्टर प्लांटसह अनेक पक्की बांधकामे उभी केली आहेत. रामपालच्या अटकेनंतर मात्र येथे शांतता पसरली आहे. 

 

Web Title: 26 crores spent on the arrest of Rampal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.