शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

२५ हजारांची बचत; पण नोटा निघाल्या बाद झालेल्या, संभाव्य उपासमारी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 06:45 IST

जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पोथियामुपानूर या गावातील सोमू आणि पलानीअम्मल या दाम्पत्याच्या डोळ्यात या अविश्वसनीय घटनेनंतर आनंदाश्रू तरळले.

इरोड (तामिळनाडू) : या जिल्ह्यातील एका वृद्ध, अपंग दाम्पत्यास गेल्या शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या रूपाने जणू देवच भेटला व कोरोना ‘लॉकडाऊन’मुळे त्यांच्यावर आलेली संभाव्य उपासमारीची वेळ टळली.जिल्ह्याच्या दुर्गम भागातील पोथियामुपानूर या गावातील सोमू आणि पलानीअम्मल या दाम्पत्याच्या डोळ्यात या अविश्वसनीय घटनेनंतर आनंदाश्रू तरळले. सोमू अंध आहेत, तर पलानीअम्मल पायाने अपंग आहेत. दोघेही गावातील मंदिरांच्या बाहेर अगरबत्ती, कापूर असे पूजासाहित्य विकून उपजीविका करतात. मार्चपासून सुरू झालेल्या ‘लॉकडाऊन’ने मंदिरांसोबतच त्यांचे चरितार्थाचे एकमेव साधनही बंद झाले. तरीही त्यांनी घरातील उरल्यासुरल्या पैशा-अडक्यावर कसेतरी तीन महिने काढले.सोमू व पलानीअम्मा यांनी म्हातारपणी हातपाय पार थकतील तेव्हा कोणाहीपुढे लाचारीने हात पसरावे लागू नयेत यासाठी घरात जपून ठेवलेल्या ‘पुंजी’ला हात घालायचे ठरविले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी त्यांची एकमेव गाय विकली होती. त्यातून मिळालेले २५ हजार रुपये त्यांनी फुटक्या ट्रंकेच्या तळाशी जपून ठेवले होते. अगदीच नाईलाज झाल्याने पोट भरण्यासाठी त्यांनी हे पैसे चरितार्थासाठी वापरायचे ठरविले.पण दुर्दैव असे की, दरम्यानच्या काळात मोदी सरकारने नोटाबंदी केल्याने या दाम्पत्याची ती बहुमोल पुंजी कवडीमोल झाली होती!जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत:च्या पगारातून २५ हजार रुपयांची केली मदत500 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ती सर्व रक्कम होती व त्या नोटा रद्द झाल्या होत्या. गावात कोणी हे पैसे घेईनात तेव्हा ते बँकेत गेले. बँकेतील अधिका-यांनी त्यांना नोटा का घेणार नाही किंवा बदलूनही मिळणार नाहीत, हे समजावून सांगितले. तरीही त्यांनी सरकारच्या एखाद्या योजनेतून मदत मिळते का, हे पाहावे असे सुचविले.- सोमू व पलानीअम्मा निरक्षर आहेतच. शिवाय या धक्क्याने ते एवढे निराश झाले की, त्यांनी सरकारी मदतीसाठी कोणताही अर्ज केला नाही. तरीही त्यांची ही करुण कहाणी पत्रकारांच्या माध्यमातून इरोडचे तरुण जिल्हाधिकारी सी. कथिरवन यांच्या कानावर गेली.- आश्चर्य असे की, कथिरवन यांनी कोणत्याही सरकारी योजनेची वाट न पाहता आपल्या स्वत:च्या पगारातील २५ हजार रुपये खास दूताकरवी सोमू व पलानीअम्मा यांच्या हाती सुपूर्द केले! सनदी अधिकाºयाच्या खुर्चीत बसलेल्या या देवमाणसाचे जिल्ह्यात सर्वत कौतुक होत आहे.

टॅग्स :Tamilnaduतामिळनाडू