शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

समाजसेवक नाहटांच्या स्मरणार्थ 25 रुपयांचे नाणे; बिकानेरमध्ये २ फेब्रुवारी रोजी होणार अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:43 IST

केंद्रीय वित्त मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे. या नाण्याचे २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनिमित्त बिकानेरमध्ये अनावरण होणार आहे.

नवी दिल्ली : बिकानेरचे प्रसिद्ध समाजसेवक हरखचंद नाहटा यांच्या स्मरणार्थ २५ रुपयांचे स्मृती नाणे जारी करण्यात येणार आहे. नाहटा यांचे सामाजिक योगदान आणि औदार्य पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने ३१ डिसेंबर २०२४ रोजी याबाबत अधिसूचनाही जारी केली आहे. या नाण्याचे २ फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीनिमित्त बिकानेरमध्ये अनावरण होणार आहे.

१९३६ मध्ये बिकानेरच्या एका प्रतिष्ठित कुटुंबात हरखचंद नाहटा यांचा जन्म झाला. समाजकार्य आणि उद्योजक म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. देशभरातील सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. समाजकल्याण, धर्म, कला, संस्कृती आणि प्राण्यांबद्दल दयाळूपणा याचा प्रसार त्यांनी केला.

त्यांनी आदिवासी जीवनातील गंभीर आव्हाने सोडवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला गती देण्यासाठी काम केले. पूर्वोत्तर राज्य त्रिपुराच्या धर्मनगर शहरापासून ते आगरतळापर्यंत रस्ता करण्यासारखे मोठे कार्य केले.

एकही पैसा न घेता...-"टेक्निशियन स्टुडिओ कोलकाता" आर्थिक परिस्थितीमुळे बंद होण्याच्या मार्गावर असताना त्यांचे कला आणि संस्कृतीबद्दलचे समर्पण जगाने पाहिले.-नाहटा यांच्या व्यवस्थापनामुळे या स्टुडिओमध्ये अनेक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांची निर्मिती झाली.-विशेष म्हणजे एकही पैसा न घेता त्यांनी तंत्रज्ञ आणि कलाकारांना यात भागीदार बनविले. नाहटा यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त टपाल विभागाने १९९९ मध्ये एक स्मरणार्थ टपाल तिकीट जारी केले होते.

असे असेल नवीन नाणेनवीन नाणे जारी करण्यात मुख्य भूमिका पार पाडणारे तज्ज्ञ बिकानेरचे सुधीर लुणावत यांच्या मते, भारत सरकारच्या मुंबई टांकसाळीतून बनवलेल्या या २५ रुपयांच्या नाण्याचे एकूण वजन ४० ग्रॅम असेल जे शुद्ध चांदीचे असेल.नाण्याची एकूण गोलाई ४४ मिलीमीटर असेल. नाण्याच्या समोरील बाजूस हरखचंद नाहटा यांच्या चित्राच्या वरच्या बाजूस हिंदीमध्ये तर खालच्या बाजूस इंग्रजीत ‘श्री. हरखचंद नाहटा यांचा २५ वा स्मरणोत्सव’ लिहिलेले असेल.चित्राच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जीवनकाळ दाखविण्यात आला असून क्रमश: १९३६-१९९९ लिहिलेले असेल. 

टॅग्स :NatakनाटकRajasthanराजस्थान