शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनायोद्धा डॉक्टरांना विमान प्रवासात २५ टक्के सवलत; इंडिगो विमान कंपनीचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 01:09 IST

विमान प्रवासात ओळखपत्र दाखविणे बंधनकारक

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून लढणाऱ्या डॉक्टर व नर्सचा गौरव करण्यासाठी येत्या डिसेंबरच्या अखेरपर्यंत या कोरोनायोद्ध्यांना विमान प्रवासात २५ टक्के सवलत देण्याचे इंडिगो विमान कंपनीने गुरुवारी जाहीर केले.

इंडिगोच्या अधिकृत वेबसाइटवरून १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२० या काळातील प्रवासासाठी काढलेल्या तिकिटावर डॉक्टर व नर्सना ही सवलत दिली जाईल. असे सवलतीचे तिकीट काढणाऱ्यांना प्रवासाच्या वेळी ‘चेक इन’ करताना त्यांच्या इस्पितळाचे ओळखपत्र दाखवावे लागेल, असे कंपनीने एका निवेदनात म्हटले.

कंपनी म्हणते प्रवासभाड्यातील या सवलतीखेरीज संपूर्ण प्रवासात या कोरोनायोद्ध्यांचा यथोचित जाहीर सन्मानही करण्यात येईल. कंपनीने या सवलत योजनेस ‘टफ कूकी स्कीम’ म्हटले आहे. त्यानुसार ‘चेक-इन’ करताना डॉक्टर व नर्सना चॉकलेटचा एक बॉक्स भेट म्हणून दिला जाईल, बोर्डिंग गेटवर त्यांच्या स्वागताची विशेष उद््घोषणा केली जाईल, विमानात प्रवेश करताना त्यांचे विशेष स्वागत केले जाईल व आसनावर बसताना त्यांना जे ‘पीपीई किट’ दिले जाईल त्यावरही ‘टफ कूकी’ असा स्टीकर लावलेला असेल.

अजूनही विमाने निम्मी रिकामीदोन महिने बंद असलेल्या देशांतर्गत प्रवासी विमानसेवा २५ मेपासून काही प्रमाणात पुन्हा सुरु करण्यात आल्या असल्या तरी बहुतांश विमाने अजूनही निम्मी रिकामीच जात आहेत. नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी गुरुवारी केलेल्या टष्ट्वीटवरूनही हेच स्पष्ट झाले. १ जुलैपर्यंत चाललेल्या ७८५ विमानसेवांमधून एकूण ७१,४७१ प्रवाशांनी प्रवास केला, असे पुरी यांनी म्हटले. म्हणजे प्रत्येक विमानाने सरासरी ९१ प्रवाशांनी प्रवास केला. देशांतर्गत प्रवासासाठी वापरली जाणारी बहुतांश विमाने एअरबस अ‍े-३२० असतात व अशा प्रत्येक विमानाची आसनक्षमता १८० असते. प्रत्येक विमानातील सरासरी ९१ प्रवासी म्हणजे निम्मी विमाने रिकामी गेल्याचे दिसते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndigoइंडिगोdoctorडॉक्टर