शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आॅपरेशन आॅलआउट सुरू करताच २४ तासांत ४ अतिरेक्यांना कंठस्नान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 06:31 IST

जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने मागे घेताच, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, सोमवारी बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शस्त्रसंधी केंद्र सरकारने मागे घेताच, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू केली असून, सोमवारी बांदिपोरा येथे झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.शस्त्रसंधी संपल्यानंतर जवानांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे. याशिवाय जवानांनी आज सकाळी बिजबेहारामध्ये दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीमही हाती घेतली आहे. सर्च आॅपरेशन सुरू केले आहे.रमजानच्या महिन्याच्या काळासाठी केंद्र सरकारने काश्मीरमध्ये शस्त्रसंधी जाहीर केली होती. भारतीय सुरक्षा दले या काळात स्वत:हून गोळीबार वा तत्सम कारवाई करणार नाहीत, पण दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यास त्यांना तोडीस तोड उत्तर देतील, असे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केले होते. ईद संपल्यानंतर शस्त्रसंधी संपवत असल्याची घोषणा सरकारने रविवारी केली. त्यानंतर, लगेचच सुरक्षा दलांनी आॅपरेशन आॅलआउट सुरू केले.बांदिपोरा येथे १४ जून रोजीही सुरक्षा दले व दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. त्या वेळी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मात्र, त्या कारवाईत एका जवानालाही वीरमरण आले होते.त्यानंतर, ईदच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी औरंगजेब नावाच्या एका जवानाचे अपहरण करून त्याला ठार मारले होते. त्यामुळे आम्हाला लगेचच कारवाईची परवानगी मिळावी, अशी मागणी सशस्त्र दलाचे जवान करीत होते. याच काळात श्रीनगरमध्ये रायजिंग काश्मीरचे संपादक शुजार बुखारी यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली. (वृत्तसंस्था)>२० अतिरेकी घुसले होतेदहा दिवसांपूर्वी पाकिस्तानातून बांदिपोराच्या जंगलात २० अतिरेकी घुसले, अशी माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. तेव्हापासून या भागात शोधमोहीम सुरू आहे. या घनदाट जंगलात आता हे अतिरेकी दोन-तीनच्या गटांत विभागले असल्याचे कळते, त्यामुळे ही मोहीम कठीण होऊन बसली आहे.>बिजबेहारा भागातही दहशतवादी लपल्याची माहिती जवानांनाआज सकाळी मिळताच,त्या भागाला वेढा घालण्यात आला आहे. तिेथे सध्या दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.>अतिरेक्यांनी अपहरण करून ठार मारलेले जवान औरंगजेब यांच्या वडिलांची लष्करप्रमुख ले. जनरल बिपिनकुमार रावत यांनी सोमवारी भेट घेतली.>अतिरेक्यांचा महिनाभर उच्छादशस्त्रसंधीच्या काळात दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात खूपच उच्छाद मांडला होता. त्यांनी या महिनाभरात ग्रेनेडने २0 हल्ले केले व ५0 वेळा दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी हल्ले केले.या हल्ल्यांमध्ये ४१ जण मरण पावले. त्यात २४ दहशतवाद्यांचाही समावेश होता. बहुतांशी दहशतवादी कुपवाडा जिल्ह्यातच मारले गेले होते.

टॅग्स :Terrorismदहशतवाद