शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

२३४ विद्यापीठेच परीक्षेस तयार; १७७ विद्यापीठांत अनिश्चितता; यूजीसीचा परीक्षा घेण्याचा आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 06:52 IST

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात, असे आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्यांना कळविले होते. त्याआधी आयोगाने सर्व विद्यापीठांकडून त्यांच्या परीक्षांची स्थिती काय आहे, याची माहिती मागविली होती.

नवी दिल्ली : पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास देशातील २३४ विद्यापीठे तयार असून, १७७ विद्यापीठांनी मात्र परीक्षा कधी घ्यायच्या, हे अद्याप ठरविलेले नाही. परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पदवी देणे योग्य होणार नाही अशी भूमिका घेऊन विद्यापीठांनी या परीक्षा घ्याव्यात असा आग्रह विद्यापीठ अनुदान आयोगाने धरला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अनिश्चतता आहे.देशातील तब्बल १७७ विद्यापीठांनी या परीक्षा घेणार का किंवा केव्हा घेणार याविषयी अद्याप निर्णय घेतलेला नाही.अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जाव्यात, असे आयोगाने काही दिवसांपूर्वी राज्यांना कळविले होते. त्याआधी आयोगाने सर्व विद्यापीठांकडून त्यांच्या परीक्षांची स्थिती काय आहे, याची माहिती मागविली होती. एकूण ९९३पैकी ६६० विद्यापीठांनी अशी माहिती कळविली आहे. त्यात १७७ विद्यापीठांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचे कळविले आहे. यावरून असे दिसते की,४५४ विद्यापीठांच्या परीक्षा मार्गी लागल्या आहेत वा होण्याच्या मार्गावर आहेत. १८२ विद्यापीठांनी आॅनलाइन वा आॅफलाइन पद्धतीने परीक्षा पूर्ण केल्या आहेत. आणखी २३४ विद्यापीठांनी आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्याचा कार्यक्रम आखला आहे तर ३८ विद्यापीठांनी संबंधित वैधानिक संस्थांच्या निदेर्शांनुसार परीक्षा घेण्यात येतील, असे कळविले आहे. कोरोनाची साथ निवळली नसताना परीक्षा घेणे मुलांच्या पालकांनाही धोक्याचे वाटत आहे.महाराष्ट्रासह, दिल्ली, ओडिशा राज्यांचा ठाम नकारमहाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा यासारख्या राज्यांनी परीक्षा घेण्यास ठाम कार दिला आहे. तरीही अयोग मात्र परीक्षा घेण्याच्या अग्रहावर कायम आहे. कायद्यानुसार राज्य सरकारेही विद्यापीठांना परीक्षा न घेताच पदव्या देण्यास सांगू शकत नाहीत, असे आयोगाचे म्हणणे आहे.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा