शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीत घरी आलेल्या 23 वर्षीय जवानाची काश्मीरमध्ये गोळया झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2017 14:15 IST

दक्षिण काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात लष्करी सेवेत असलेल्या एका जवानाची गोळया झाडून हत्या करण्यात आली.

ठळक मुद्देइरफान अहमद दार काल संध्याकाळी त्यांच्या घारत बाहेर पडला होता.

शोपियन - दक्षिण काश्मीरच्या शोपियन जिल्ह्यात लष्करी सेवेत असलेल्या एका जवानाची गोळया झाडून हत्या करण्यात आली. इरफान अहमद दार असे मृत जवानाचे नाव आहे. शनिवारी सकाळी इरफानचा मृतदेह सापडला. शुक्रवार संध्याकाळपासून इरफान बेपत्ता होता. इरफान सुट्टी घेऊन घरी आलेला असताना त्याची हत्या करण्यात आली. 

पोलिसांनी दहशतवादी संघटनांवर संशय व्यक्त केला आहे. इरफान फक्त 23 वर्षांचा होता. नियंत्रण रेषेजवळ गुरेझमध्ये लष्कराच्या इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये इरफान कार्यरत होता. इरफान अहमद दार काल संध्याकाळी घरातून त्याची गाडी घेऊन बाहेर पडला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला असे वरिष्ठ अधिका-याने सांगितले. घटनास्थळापासून त्याची गाडी एक किलोमीटर अंतरावर सापडली. 

दक्षिण काश्मीरच्या दौ-यावर असलेल्या जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या हत्येचा निषेध केला आहे.  इरफान मूळचा काश्मिरी आहे. मे महिन्यात शोपियनमध्ये रहाणारे लेफ्टनंट उमर फय्याज (२२) यांची अतिरेक्यांनी अपहरण करून हत्या केली होती. सप्टेंबर महिन्यात दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाचे  जवान मोहम्मद रमझान यांची गोळया झाडून हत्या केली होती. मोहम्मद रमझान आणि त्यांच्या कुटुंबाने दहशतवाद्यांच्या अपहरणाच्या प्रयत्नाला प्रतिकार केल्यानंतर  दहशतवाद्यांनी गोळया झाडून त्यांची हत्या केली होती. 

कोण होते उमर फय्याज उमर फय्याज हे रजा घेऊन शोपियान जिल्ह्यात लग्न समारंभाला उपस्थित राहण्यास आले असताना, अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण करून हत्या केली. सहा महिन्यांपूर्वीच लष्करात रूजू होऊन ते काश्मीरमध्ये रोल मॉडेल बनले होते. पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीतील १२९ व्या तुकडीचे ते विद्यार्थी होते. दक्षिण काश्मीरमधील अशमुकुम येथील सरकारी नवोदय विद्यालयात त्यांचे शिक्षण झाले होते. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान