शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

गोरखपूर तुरुंगातील २३ कैद्यांना एचआयव्ही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:14 AM

उन्नाव जिल्ह्यातील तीन खेड्यांत ५८ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर गोरखपूर तुरुंगातही २३ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील बहुतेकजण कच्चे कैदी आहेत.

गोरखपूर : उन्नाव जिल्ह्यातील तीन खेड्यांत ५८ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर गोरखपूर तुरुंगातही २३ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील बहुतेकजण कच्चे कैदी आहेत.गेल्या काही महिन्यांत तुरूंगात घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरांतून हा प्रकार समोर आला. कैद्यांची तपासणी उत्तर प्रदेश राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या देखरेखीखाली झाली, असे गोरखपूर तुरुंगाचे अधीक्षक रामधनी मिश्रा म्हणाले. गेल्या अनेक महिन्यांत घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात एका महिलेसह २३ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले. त्या सगळ््यांवर बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयातील एआरटी केंद्रात उपचार सुरू आहेत व तेथेच त्यांना त्यांची सगळी औषधे व इतर वैद्यकीय मदत मिळते, असे ते म्हणाले.रामधनी मिश्रा यांनी एचआयव्हीचा संसर्ग का झाला याचा तपशील दिला नाही. संसर्गाचा स्त्रोत कोणता हे कळणे आमच्यासाठी खूपच कठीण आहे. हे कैदी आरोग्य तपासणीत एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले एवढेच आम्ही सांगू शकतो, असे सांगितले.तुरुंग विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार गोरखूपर तुरुंगातील १,४०० कैद्यांची तपासणी झाली असून, आणखी ४०० कैद्यांची तपासणी केली जात आहे. महानिरीक्षक (तुरुंग) प्रमोद कुमार मिश्रा म्हणाले की, अशा संसर्गाच्या रुग्णांना शोधण्याचे काम संपूर्ण उत्तर प्रदेशमधील तुरुंगांत सुरू आहे व निष्कर्षांचा अहवाल राज्य सरकारला दिला जात आहे. या रुग्णांमध्ये चांगली आरोग्य जागरूकता वाढावी, यासाठी आम्ही तपासणी शिबिरे घेत असतो.सीरिंजमुळे ५८ जणांना लागण झाल्याचा आरोप-गेल्या महिन्यात बंगारमाऊ (जिल्हा उन्नाव) तहसीलअंतर्गत तीन खेड्यांतील ५८ रहिवासी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले होते. नोव्हेंबर २०१७ व गेल्या जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात उघडकीस आली. हा संसर्ग बनावट डॉक्टरांनी दूषित सीरिंज वापरल्यामुळे झाल्याचा आरोप आहे.हे रुग्ण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभाग, नॅको (नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन) व युपीएसएसीएसचे अधिकारी त्या वसाहतींत लोकांमध्ये आरोग्य जागृतीसाठी गेले व त्यांनी शिबिरे घेतली.

टॅग्स :Gorakhpurगोरखपूर