शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात २२ जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावले; मृत्यूमागे कोविड लसीचा संबंध असल्याचा सिद्धरामय्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 20:59 IST

नागरिकांमध्ये घबराट; हृदयरोगाच्या तपासणीसाठी रुग्णालयात गर्दी

कर्नाटकातील हसन जिल्ह्यात हृदयविकाराच्या झटक्यानंतर अचानक झालेल्या मृत्यूंमुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या ४० दिवसांत एकट्या हसन जिल्ह्यात २२ जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ३० जून रोजीच तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बहुतेक तरुण आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेचा संबंध कोविड लसीकरणासोबत जोडला आहे. 

कर्नाटकात तरुणांमध्ये अचानक हृदयविकाराच्या धक्क्यामुळे मृत्यूच्या घटना वाढल्याने सरकारला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तज्ञांच्या समितीला त्यांचे निष्कर्ष सादर करण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. गेल्या महिन्यात, हसन जिल्ह्यात किमान २० लोक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले होते. त्यापैकी अनेकांना पूर्वी कोणतीही लक्षणे किंवा आजार नव्हते. हसन जिल्ह्याच्या उपायुक्त के.एस. लताकुमारी म्हणाल्या की, "असंसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञांची एक टीम या प्रकरणाची चौकशी करेल आणि लवकरच अहवाल सादर करेल. या अहवालात हृदयविकाराच्या कारणांचा अभ्यास केला जाईल."

दुसरीकडे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत एक्स पोस्ट करुन मोठे विधान केले आहे. त्यांनी ही अतिशय गंभीर बाब असल्याचे म्हटलं. "हसनमध्ये होत असलेल्या मृत्यूबद्दल आम्हाला चिंता आहे. गेल्या एका महिन्यात फक्त एकाच जिल्ह्यात हसनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने २० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ही एक अतिशय गंभीर बाब आहे. सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे आणि कारण शोधण्यासाठी डॉ. रवींद्रनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. समितीला १० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत," असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

"फेब्रुवारीमध्येच, या समितीला राज्यातील तरुणांच्या अचानक मृत्यूंमागील कारणांची सविस्तर चौकशी करण्याची आणि कोविड लसीचे काही दुष्परिणाम आहेत का हे तपासण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आता या दिशेने रुग्णांची तपासणी केली जात आहे आणि माहितीचे विश्लेषण देखील केले जात आहे," असेही सिद्धरामय्या यांनी म्हटलं.

दरम्यान, हसनमध्ये आतापर्यंत झालेल्या २२ मृत्यूंपैकी ५ जण १९ ते २५ वर्षे वयोगटातील होते आणि ८ जण २५ ते ४५ वर्षे वयोगटातील होते.  मृतांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी आहे. या घटनेनंतर बंगळुरूमधील जयदेव रुग्णालयात हृदयरोगाच्या तपासणीसाठी येणाऱ्या लोकांची गर्दी वाढली आहे. ओपीडीमध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या ८ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. यातील बहुतेक लोक हसन आणि आसपासच्या जिल्ह्यांतील आहेत.

टॅग्स :Karnatakकर्नाटकHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart Diseaseहृदयरोग