शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

२२... मालेवाडा... कर्जवसुली

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

दुष्काळी परिस्थितीत पीककर्ज वसुलीचा तगादा

दुष्काळी परिस्थितीत पीककर्ज वसुलीचा तगादा
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : शेतकऱ्यांना बजावल्या नोटीस
मालेवाडा : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना शेतीचा खर्च आणि प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. त्यातच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीककर्ज वसुलीसाठी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस बजावल्या आहेत. सदर कर्जाची परतफेड १५ दिवसांच्या आत न केल्यास कारवाई करण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
भिवापूर तालुक्यातील मालेवाडा व परिसरातील शेतकऱ्यांना नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळी शाखेतून पीककर्जाची उचल केली होती. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आजवर सदर बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाचा नियमित भरणा केला आहे. गेल्या खरीप हंगामात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने काही तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप केले नाही. ऐन पेरणीच्या काळात ही परिस्थिती उद्भवल्याने शेतकऱ्यांनी या बँकेकडून घेतलेल्या पीककर्जाची परतफेड केली. पीककर्जाचा भरणा केल्यानंतर नव्याने कर्ज मिळण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी हातचा पैसा सोडला नाही.
काही शेतकऱ्यांनी यातून मार्ग काढत अन्य राष्ट्रीयीकृत बँकांकडून तर काहींनी सावकारांकडून कर्जाची उचल केली. यावर्षी प्रतिकूल वातावरणामुळे सोयाबीनचे पीक हातचे गेले. कमी उत्पादन होऊनही सोयाबीनला कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी व मिरचीकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यातच कपाशीवर लाल्या आणि मिरचीवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने दोन्ही पिके उद्ध्वस्त झालीत. भिवापूर तालुक्यातील सोयाबीन, कपाशी व मिरची शिवाय तिसरे कोणतेही प्रमुख घेतले जात नसल्याने तसेच या तिन्ही पिकांवर प्रतिकूल वातारणाचा विपरीत परिणाम झाल्याने शेतातून घरी आलेल्या या पिकांचा उत्पादनखर्चही भरून निघाला नाही. कापसालाही यंदा चांगला भाव मिळत नाही.
पावसाच्या लपंडावामुळे यावर्षी भिवापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. यातून सावरत शेतकऱ्यांनी पेरणी करून पिकांची चांगली मशागत केली. मात्र, समाधानकारक पीक हाती आले नाही. त्यात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. वास्तवात, भिवापूर तालुक्यात यावर्षी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी पैसेवारीची (आणेवारी) अट आडवी येत असून,