२२... मालेवाडा... कर्जवसुली... जोड
By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST
स्थानिक तलाठी कार्यालयात बसूून पैसेवारी काढत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला. पैसेवारी काढण्याची पद्धती सदोष असल्याने त्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नेहमीच नुकसान होत असल्याचे काहींनी सांगितले. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी भिवापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसेच ही कर्जवसुली थांबवून शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांसह परिसरातील सरपंचांनी केली आहे. (वार्ताहर)
२२... मालेवाडा... कर्जवसुली... जोड
स्थानिक तलाठी कार्यालयात बसूून पैसेवारी काढत असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला. पैसेवारी काढण्याची पद्धती सदोष असल्याने त्या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नेहमीच नुकसान होत असल्याचे काहींनी सांगितले. दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधींनी भिवापूर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसेच ही कर्जवसुली थांबवून शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करण्याची मागणी शेतकऱ्यांसह परिसरातील सरपंचांनी केली आहे. (वार्ताहर)-----------चौकट--------कारवाईचा इशारानागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जवळी शाखेने कर्जदार शेतकऱ्यांना कर्जवसुलीच्या नोटीस बजावल्या. सदर कर्जाची परतफेड नोटीस प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत करण्याची सूचनाही त्या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. या काळात कर्जाचा भरणा न केल्यास कर्जदार शेतकऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही या नोटीसद्वारे देण्यात आला आहे. या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर पीककर्ज नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अखत्यारित कार्यरत असलेल्या सेवा सहकारी संस्थेमार्फत शेतकऱ्यांना दिले जाते. कर्ज घेतेवेळी संबंधित शेतकऱ्याकडून शेअर्सची रक्कम कर्जाच्या रकमेतून कपात केली जाते. ही रक्कम शेतकऱ्यांना परत करण्यासंदर्भात बँक प्रशासन काहीही हालचाली करीत नाही. उलट शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीचा तगादा लावला जातो. या शेअर्सच्या रकमेतून कर्जाच्या रकमेची कपात करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.***