शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

लय भारी! प्रेम विवाहानंतर नशीब फळफळलं, गावकऱ्यांनी थेट सरपंचच केलं; नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 15:40 IST

प्रेमविवाहामुळे एका महिलेचं नशीब बदललं आणि अवघ्या 21 व्या वर्षी ती गावची सरपंच झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - प्रेमाचे अनेक किस्से हे सातत्याने समोर येत असतात. प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. कुटुंबीयांचा विरोध पत्करून लग्न करतात. अनेकदा प्रेमविवाहामुळे धक्कादायक घटना घडतात. असं असताना एक अजब घटना पाहायला मिळाली आहे. प्रेमविवाहामुळे एका महिलेचं नशीब बदललं आणि अवघ्या 21 व्या वर्षी ती गावची सरपंच झाल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात नाहरमऊ नावाचं एक गाव आहे.  या गावातील 21 वर्षीय महिला जानकी गोंड हिची ग्रामस्थांनी सरपंचपदी बिनविरोध निवड केली आहे. 

जानकीची सरपंच म्हणून निवड करण्यामागे एक रंजक कथा आहे. चार वर्षांपूर्वी तिचा नाहरमऊ येथील गौरव पटेल याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. सुखी संसार सुरू होता. पण याच दरम्यान ती कधीतरी गावची सरपंच होईल असा विचार देखील तिने कधी केला नव्हता. पण अचानक चमत्कार झाला आणि हे सर्व घडलं. नाहरमऊ ग्रामपंचायत ही अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव होती. यानंतर गावात सरपंचपदाच्या उमेदवाराचा शोध सुरू झाला. तेव्हा फक्त जानकीच होती. 

जानकीला गावकरी आणि कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिले आणि तिला बिनविरोध सरपंच करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. विशेष म्हणजे आता आदिवासी विकास ब्लॉक केसली येथील नाहरमऊ ग्रामपंचायतीचा समावेश राज्यातील समरस पंचायतींमध्ये होणार आहे. येथे जानकी सरपंच व 16 पंचही बिनविरोध निवडून आले आहेत. जानकीला जिल्ह्यातील सर्वात तरुण सरपंच होण्याची संधी मिळाली आहे.

जानकीनमे दिलेल्या माहितीनुसार, "आता प्राधान्यक्रम बदलला आहे. पूर्वी मी घरातच होती, पण आता कुटुंब खूप मोठे झाले आहे. गावातील प्रत्येक समस्या मी गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढेन. सर्वात महत्त्वाच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष दिले जाईल. मी स्वतः फक्त दहावीपर्यंत शिकले आहे. आपली पुढची पिढी शिक्षित होऊन पुढे गेली पाहिजे. येथे पोलीस चौकी सुरू व्हावी, यासाठी मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था करण्यात येईल. प्रत्येक घरात पाणी, स्वच्छतागृहे, घरांची व्यवस्था, चांगल्या रस्त्यांची व्यवस्था याकडे मी विशेष लक्ष देईन." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.