लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : यावर्षी आतापर्यंत देशात विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाची १८३ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, तर २०२४ मध्ये अशा प्रकरणांमध्ये सुमारे सहा टक्क्यांनी घट झाली आहे. ही माहिती सरकारने सोमवारी राज्यसभेत दिली.
सरकार काय करतेय?
अहमदाबाद विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) सुरक्षिततेची खात्री करणाऱ्या महत्त्वाच्या भागांची तपासणी आणि इतर प्रक्रिया आणखी कडक केली आहे. यामुळे त्रुटी ओळखण्यास मदत होणार आहे.
४६० जणांचा २०२५ मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला आहे. २६० लोकांचा १२ जून २०२५ रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातात मृत्यू झाला.
विमानातील तांत्रिक बिघाड घटना
२०२५ (२३ जुलैपर्यंत) ३,९२५२०२४ ४,०१६२०२३ ५,५१३२०२२ ३,७८२२०२१ ४,१३१