शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

२०२० मध्ये देशभरात पोलिसांच्या तावडीतून ९३१ गुन्हेगार झाले फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 06:08 IST

१०३ गुन्हेगार महाराष्ट्रातील; ११७ पोलिसांवर गुन्हे

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागानुसार २०२० मध्ये देशभरात एकूण ९३१ गुन्हेगार गुंगारा देत पोलिसांच्या तावडीतून पसार होण्यात यशस्वी झाले. यापैकी सर्वाधिक १०३  गुन्हेगार महाराष्ट्रातील आहेत. यापैकी ९२ गुन्हेगार कोठडीबाहेर अन्य ठिकाणी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलिसांच्या तावडीतून फरार झाले.राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार राज्यात गुन्हेगार पसार होण्याच्या एकूण ८८ घटना घडल्या.  एकूण फरार गुन्हेगारांपैकी ७८ गुन्हेगारांनाच पुन्हा जेरबंद करण्यात आले; परंतु एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीत पुन्हा पकडण्यात आलेल्या गुन्हेगारांना फरार म्हटलेले नाही. तथापि अशा कोणत्याही प्रकरणात महाराष्ट्रातील एकाही पोलिसाला कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी आरोपी करण्यात आलेले नाही.महाराष्ट्रांनंतर मध्य प्रदेशातून ९२, पंजाबमधून ८६, ओडिशातून ६८, गुजरातमधून ६६ आणि उत्तर प्रदेशात ५७ गुन्हेगारांनी चकवा देत पोलिसांच्या तावडीतून पळ काढला. मध्य प्रदेशात ७९ गुन्हेगारांना, पंजाबमध्ये ६४, ओडिशात २२, गुजरातेत ५८  आणि उत्तर प्रदेशात ४७ गुन्हेगारांना पुन्हा जेरबंद करण्यात आले. गुन्हेगार फरार होण्याच्या घटनेप्रकरणी एकूण ११७ पोलीस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.  असे सर्वाधिक गुन्हे  पंजाबमध्ये ३९ , उत्तर प्रदेशात २४,  तेलंगणमध्ये  १०,  केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमध्ये १० नोंदविण्यात आले.  याप्रकरणी एकूण ८५ पोलिसांना अटक करण्यात आली. यापैकी २४ पंजाबचे, १२ उत्तर प्रदेशचे, १० तेेलंगणचे, १० जम्मू-काश्मिरचे होते.