शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019: च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 09:07 IST

Lok Sabha Election 2019 :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2019च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2019च्या लोकसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोणाशीही आघाडी करणार नसल्याचंही अरविंद केजरीवालांनी स्पष्ट केलं. केजरीवालांनी हरियाणातल्या जिंद जिल्ह्यातील आम आदमी पार्टीच्या सभेला संबोधित करताना स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकांबरोबरच लोकसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.    

 अनेक पक्ष महागठबंधनमध्ये सहभागी होत आहेत. त्यांनी देशाच्या विकासात कोणतीच भूमिका बजावलेली नाही असे ही केजरीवाल यांनी म्हटले आहे. दिल्लीच्या विकासात केंद्र सरकार हस्तक्षेप करून आडकाठी आणत असल्याचा आरोपही केजरीवालांनी केला आहे. मी कोणत्याही महाआघाडीमध्ये सहभागी होणार नाही. दिल्लीतली अनेक कामे रखडण्यास केंद्र सरकार जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. दिल्लीतल्या शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रांत आम्ही भरपूर काम केलं आहे. भाजपा हा पक्ष धर्माच्या नावाखाली लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना लोकांच्या भावनांशी काहीही देणं-घेणं नाही. तसेच केजरीवालांनी हरियाणातल्या भाजपा सरकारवरही टीका केली. 

दिल्लीच्या बरोबरीत हरियाणाचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी खरा विकास  कसा करावा हे आमच्याकडून शिकावं. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा नसतानाही आम आदमी पार्टीनं वीज, पाणी आणि आरोग्य, शिक्षण क्षेत्रांत क्रांतिकारी काम केलं आहे. हरियाणातलं खट्टर सरकार असा विकास का करू शकत नाही, असा प्रश्नही केजरीवालांनी विचारला आहे. तसेच अंबालाच्या शहीद जवानाच्या कुटुंबीयांना खट्टर सरकारनं 1 कोटींची आर्थिक मदत करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप