शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपूर्वी आलेल्या पूरासाठी मोदी सरकारची मदत जाहीर; हिमाचल प्रदेशला दिले २००० कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:56 IST

हिमाचल प्रदेशात आलेल्या पूरामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे.

Himachal Pradesh Flood: दोन वर्षांपूर्वीहिमाचल प्रदेशात आलेल्या पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळे झालेल्या विध्वंसाने लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले होते. आता केंद्र सरकारने राज्याला पुन्हा रुळावर आणण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. पूर, भूस्खलन आणि ढगफुटीसारख्या आपत्तींमुळे बाधित झालेल्या भागांच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारने हिमाचल प्रदेशला २,००६.४० कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने ही रक्कम मंजूर केली आहे. हिमाचल प्रदेशात झालेल्या पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे राज्याचे १२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार कोणत्याही भेदभावाशिवाय आपत्तींच्या काळात राज्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या दिशेने, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने २०२३ सालासाठी पूर, भूस्खलन आणि ढगफुटीसारख्या आपत्तींनी बाधित झालेल्या भागात पुनर्बांधणीसाठी हिमाचल प्रदेशला २००६.४० कोटी रुपयांची मदत मंजूर केली. गृह मंत्रालयाने डिसेंबर २०२३ मध्ये या आपत्तीतून मदत आणि पुनर्वसनासाठी हिमाचल प्रदेशला ६३३.७३ कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत देखील दिली होती. २०२४-२५ या आर्थिक वर्षात, मोदी सरकारने एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अंतर्गत राज्यांना २५,४२५.१६ कोटी रुपयांची रक्कम दिली आहे जी आपत्ती व्यवस्थापनाप्रती संवेदनशीलतेचे प्रतीक आहे," असं गृहमंत्रालयाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

यापूर्वी, १२ डिसेंबर २०२३ रोजी, गृह मंत्रालयाने या आपत्तीमुळे बाधित झालेल्या हिमाचल प्रदेशसाठी एनडीआरएफकडून ६३३.७३ कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत मंजूर केली होती. जोशीमठ आपत्तीनंतर उत्तराखंडसाठी १६५८.१७ कोटी रुपयांच्या आणि २०२३ च्या जीएलओएफ आपत्तीनंतर सिक्कीमसाठी ५५५.२७ कोटी रुपयांच्या योजनांना केंद्र सरकारने मान्यता दिली होती.

याशिवाय, केंद्र सरकारने शहरी पूर (३०७५.६५ कोटी रुपये), भूस्खलन (१००० कोटी रुपये), भूस्खलन (१५० कोटी रुपये), जंगलातील आग (८१८.९२ कोटी रुपये), वीज पडणे (१८६.७८ कोटी रुपये) आणि दुष्काळ (२०२२.१६ कोटी रुपये) या क्षेत्रातील धोका कमी करण्यासाठी ७२५३.५१ कोटी रुपयांच्या एकूण आर्थिक खर्चासह अनेक औपचारिक प्रकल्पांना मान्यता दिली होती.

दरम्यान, २०२३ मध्ये अतिवृष्टीमुळे हिमाचल प्रदेशचे मोठे नुकसान झाले. पाऊस आणि पुरामुळे कुल्लू, मनाली, शिमला आणि मंडीसह संपूर्ण राज्यात १२ हजार कोटींचे नुकसान झालं होतं. त्यावेळी राज्यातील सुखू सरकारने अनेकदा केंद्रावर नुकसान भरपाईसाठी कोणतीही मदत मिळाली नाही असे आरोप केले होते. मात्र आता केंद्राकडून २ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशfloodपूरRainपाऊस