शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात मागासवर्गीयांसाठी वर्षाला २० हजार कोटींचा निधी, काँग्रेसचे आश्वासन; सहा महिन्यांत जातनिहाय गणना करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 12:51 IST

सत्ता मिळाल्यास सहा महिन्यांच्या आत जातनिहाय गणना करणार असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे. 

हैदराबाद : तेलंगणात मागासवर्गीय घटकांच्या कल्याण योजनांकरिता दरवर्षी २० हजार कोटी रुपयांचा तर अल्पसंख्याक समाजाच्या विकास योजनांकरिता चार हजार कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे. सत्ता मिळाल्यास सहा महिन्यांच्या आत जातनिहाय गणना करणार असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे. 

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  दिलेल्या आश्वासनात काँग्रेसने म्हटले आहे की, तेलंगणात सरकारी नोकऱ्या, शिक्षणक्षेत्रात मागासवर्गीयांन तसेच अल्पसंख्याकांना योग्य राखीव जागा देण्यात येतील. अल्पसंख्याक समाजातील बेरोजगार युवक व महिलांना एक हजार कोटी रुपयांची कर्जे सवलतीच्या व्याजदरात दिली जातील. इमाम, मुएझिन, खादिम, पाद्री आणि ग्रंथी या धर्मगुरुंना महिना १० ते १२ हजार रुपयांचे मानधन देण्याचे आश्वासनही दिले आहे. (वृत्तसंस्था) 

भाजपच्या यादी, १४ उमेदवारांचा समावेशतेलंगणामध्ये भाजपने शुक्रवारी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली असून, त्यात १४ जणांचा समावेश आहे. त्यामध्ये भाजपचे माजी आमदार एन. रामचंद्र राव यांचाही समावेश असून, त्यांना मलकाजगिरी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या भाजपच्या अंतिम यादीत ए. श्रीदेवी (बेल्लामपल्ली राखीव मतदारसंघ), दुग्याला प्रदीप (पेड्डापल्ली), रवी कुमार यादव (सेरिलिंगमपल्ली), राहुल चंद्र (नामपल्ली), के महेंद्र आदींचा समावेश आहे. 

अल्पसंख्याकांतील बेघरांना घरासाठी ५ लाखांचे साहाय्यतेलंगणामध्ये शीख अल्पसंख्याक वित्तसाहाय्य महामंडळ स्थापन करण्याचा तसेच उर्दू माध्यमातील शाळांत शिक्षक भरती करण्याचे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे. अल्पसंख्याक समाजातील बेघर लोकांना जागा देण्याचे व घर बांधण्यासाठी ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्याची तयारी काँग्रेसने दाखविली आहे.  या समाजातील विवाहित जोडप्यांना १ लाख ६० हजार रुपये देण्यात येतील. 

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३congressकाँग्रेस