शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

Jammu And Kashmir : लष्कराला मोठं यश! ऑक्टोबरपर्यंत तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा

By सायली शिर्के | Updated: November 3, 2020 15:27 IST

Jammu And Kashmir : ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठं यश मिळालं आहे. या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंत जवानांनी विविध दहशतवादी संघटनांच्या तब्बल 200 दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती मिळत आहे. 2019 मध्ये 157 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते. या वर्षभरात खात्मा करण्यात आलेल्या अनेक दहशतवाद्यांमध्ये टॉप कमांडर्सचा समावेश होता. 

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये एप्रिल महिन्यात 28 दहशतवादी मारले गेले. तर जुलै आणि ऑक्टोबरमध्ये 21 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तसेच दक्षिण काश्मीरमध्ये सर्वाधिक चकमकी झाल्या. ज्यामध्ये ऑक्टोबरपर्यंत 138 दहशतवादी मारले गेले. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी 200 मधील 190 दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा झाल्याचं म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात अत्यंत वेगाने सर्च ऑपरेशन्स सुरू आहेत. 

काही दिवसांपूर्वी श्रीनगरमध्ये भारतीय सैन्य, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या जॉईंट ऑपरेशनमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश आले. हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडरचा (Hizbul Mujahideen Chief Commander) खात्मा करण्यात आला. सैफुल्लाह असं दहशतवाद्याचं नाव आहे. सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर पोलिसांना श्रीनगरच्या रंगरेथ परिसरात हिज्बुल मुजाहिद्दीनचे दोन टॉप दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिसांची एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांनी एक जॉईंट ऑपरेशन सुरू केले. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले.

हिज्बुल मुजाहिदीनच्या टॉप कमांडरचा खात्मा, एकाला अटक

जॉईंट ऑपरेशनमध्ये हिज्बुलचा टॉप कमांडर सैफुल्लाह उर्फ गाजी हैदरचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीर आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही ऑपरेशन दरम्यान सैफुल्लाह नावाच्या एका कमांडरचा खात्मा केला आहे. त्याची ओळख पटवण्यात येत आहे. मात्र तो 95 टक्के सैफुल्लाह असल्याची आमची खात्री आहे. तसेच एका दहशतवाद्यालाही अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान