शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये तिरंगा यात्रेसाठी निघालेल्या 200 भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 16:11 IST

स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी तिरंगा यात्रेत सामील झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.  

ठळक मुद्दे200 भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटकमोबाईल इंटरनेट सेवा स्थगित सरकारचा नियोजित प्लॅन होता - ओमर अब्दुल्ला

श्रीनगर, दि. 15 - स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमधील लाल चौकात तिरंगा फडकविण्यासाठी तिरंगा यात्रेत सामील झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यातील तणावाची परिस्थिती पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. भाजपाच्या युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्याक्ष अैजाझ हुसैन यांच्यासह काही कार्यकर्त्यांना सोमवारी रात्री अटक केली. तर अबी गुलजार यांच्यासह काही जणांना आज सकाळी ताब्यात घेतले असून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 200 भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते. याचबरोबर येथील मोबाईल इंटरनेट सेवा प्रशासनाकडून स्थगित करण्यात आली आहे.स्वातंत्र्यदिनानिमित्त काश्मीरमध्ये आज भाजपाच्यावतीने तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. उद्यापासून या यात्रेला सुरुवात होणार आहे. यामध्ये विविध गटांचे नेते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणार आहेत. भाजपाचे प्रत्येक खासदार आपल्या मतदार संघात ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ चा जयघोषही करणार आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले, भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक करणे, हे सरकारचा नियोजित प्लॅन होता, असे म्हटले आहे.