शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल-रेस्टॉरन्टमध्ये विकलं जातंय कुत्रे-मांजरांचं मांस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 13:03 IST

बर्फाच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या छापेमारीत धक्कादायक बाब समोर आली.

कोलकाता- पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या राजाबाजारमध्ये एका बर्फाच्या फॅक्टरीमध्ये झालेल्या छापेमारीत धक्कादायक बाब समोर आली आहे. मेलेल्या जनावरांच्या मांसावर त्या बर्फाच्या फॅक्टरीमध्ये प्रक्रिया करून हॉटेल- रेस्टॉरन्टमध्ये विकलं जातं असल्याचं समोर येतं आहे. कोलकात्यातील बर्फाच्या फॅक्टरीमध्ये सुरू झालेली छापेमारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या छापेमारीत पॅक केलेल्या आणि विकण्यासाठी तयार असलेलं एकुण 20 टन मांस जप्त करण्यात आलं.  टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

मेलेल्या जनावरांचं मांस घेऊन जाणाऱ्या तीन लोकांना अटक केल्यानंतरच्या एका आठवड्यात ही छापेमारी झाली आहे. जनावरांचं मांस बेकायदेशीरपणे विकलं जातं असल्याचा संशय गेल्या अनेक दिवसांपासून तेथिल यंत्रणांना होता. या कारवाईनंतर संशय खरा झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. मेलेल्या जनावरांच्या मांसातील जास्त मास हे रस्त्यावरील कुत्रे व मांजरांचं असतं, असा दावा पोलिसांनी आधी अटक केलेल्या तीन आरोपींनी केला होता. दरम्यान, कुठल्याही निष्कर्षावर पोहचण्याआधी वैज्ञानिक परिक्षण करण्याचा सल्ला कोलकाता नगर निगमने दिला आहे. ताज्या मांसाबरोबर एकत्र केलं जातं जनावरांचं मांस

छापेमारीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. जनावरांच्या मांसाला केमिकलबरोबर 44 डिग्री सेल्सिअस तापमानात चार ते पाच दिवस रेफ्रिजरेट केलं जातं. त्यानंतर त्याला ताज्या मांसात मिसळून 20 किलोच्या वजनाची पाकिटं तयार केली जातात. अशी एकुण 1 हजार पाकिटं महागड्या हॉटेलमध्ये विकली जातात.  केएमसीच्या अतिन घोष यांनी सांगितलं की, मांसाच्या तपासणीसाठी ते सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या संपर्कात आहे. या मांसाची चाचपणी सुरू आहे.