२०... काटोल
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
काटोल येथे श्रीराम जन्मोत्सव
२०... काटोल
काटोल येथे श्रीराम जन्मोत्सवकाटोल : स्थानिक श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. शनिवारी (दि. २१) घटस्थापना, श्रीराम मूर्तीस महाभिषेक, आरती, तीर्थप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शनिवारपासून शुक्रवारपर्यंत रोज सायंकाळी ४ वाजता अध्यात्म रामायण वाचन केले जाईल. शुक्रवारी (दि. २७) रात्री ८.३० वाजता श्रीधर खोंड यांचे कीर्तन, शनिवारी (दि. २८) सकाळी प्रभू रामचंद्राला अभिषेक, सकाळी १० वाजता श्रीधर खोंड यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्म, पाळणा, आरती, तीर्थप्रसाद, पहाटे रामपादुका व श्री हनुमानाच्या मूर्तीची मिरवणूक, मंगळवारी (दि. ३१ रात्री) श्रीधार खोंड यांचे कीर्तन, बुधवारी (दि. १) सायंकाळी ४ वाजता काल्याचे कीर्तन, महाप्रसाद, गुरुवारी (दि. २) रात्री ९ वाजता शेजारतीनिमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. (तालुका प्रतिनिधी)***