शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
2
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
3
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
4
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
5
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
6
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
7
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
8
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
9
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंह, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
10
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
11
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक
12
पाकविरोधात आणखी मोठी कारवाई? गृहमंत्र्यांच्या J&Kच्या मुख्यमंत्री-नायब राज्यपालांना सूचना...
13
Kangana Ranaut : "मोदींनी त्यांना दाखवून दिलं"; 'ऑपरेशन सिंदूर' नंतर कंगना राणौतची सैन्याच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना
14
Operation Sindoor: भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या मसूद अजहरवर घाव! 'मरकज सुभानल्लाह' उडवले, व्हिडीओ बघा
15
खबरदार! आणखी काही कराल तर...; पत्रकार परिषद संपवताना विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा 
16
"ही ताकद नव्हे तर भ्याडपणा!"; भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी अभिनेत्रीचा तीळपापड, म्हणाली-
17
चीननं भारतावर लावला १६६ टक्क्यांपर्यंत टॅरिफ; पाक तणावादरम्यान ड्रॅगनची घोषणा, 'या' क्षेत्रांवर परिणाम?
18
"रात्री चार ड्रोन आले अन्..."; पाकिस्ताने तरुणाने सांगितला कसा उडवला गेला हाफिज सईदचा अड्डा
19
“निष्पाप भारतीयांवर भ्याड हल्ला केलेल्या पाकिस्तानला चोख उत्तर”: विजय वडेट्टीवार
20
Eknath Shinde : "लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम करणाऱ्यांना धडा शिकवला"; शिंदेंनी केलं मोदींचं अभिनंदन

हिमाचलात पेच वाढला! मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच; २ दिग्गजांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2022 06:31 IST

मुख्यमंत्रिपदासाठी प्रतिभा सिंह, सुखविंदरसिंग सुख्खू यांचा दावा

आदेश रावलनवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातकाँग्रेसला बहुमत मिळाले असले तरी मुख्यमंत्रिपदाच्या निर्णयाबद्दल पक्षापुढे पेच निर्माण झाला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा आणि प्रभारी राजीव शुक्ला शुक्रवारी आमदारांच्या बैठकीसाठी गेले असता त्यांना ज्येष्ठ नेत्या प्रतिभा सिंह यांच्या समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. सुखविंदरसिंग सुख्खू यांनीही दावा केला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांमध्ये शिमला पक्ष कार्यालयात धक्काबुक्की झाली. त्यामुळे ही बैठक तब्बल ५ तास विलंबाने सुरू झाली. निरीक्षकांनी सर्व आमदारांचे मत जाणून घेतले. ते वरिष्ठांना कळविण्यात येईल. त्यानंतर मुख्यमंत्र्याचे नाव जाहीर करण्यात येणार आहे.  निरीक्षकांनी आमदारांच्या बैठकीपूर्वी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. 

आमदारांचा ठराव पक्षश्रेष्ठींकडे पाठविलाप्रतिभा सिंह आणि सुखविंदरसिंग सुख्खू यांनी आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केल्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रत्येक आमदाराचे मत जाणून घेण्यात आले. त्यानंतर यासंदर्भातील ठराव मंजूर करून दिल्लीला पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आला. आता हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत.

गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांचेच नाव निश्चितभाजपने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पक्षाच्या संसदीय मंडळाचे ज्येष्ठ सदस्य बी. एस. येडियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांची गुजरातमधील विधिमंडळ पक्षाच्या नेत्याच्या निवडीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. भूपेंद्र पटेल हे राज्याचे मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाल्याने विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड ही केवळ औपचारिकता आहे. 

नव्या सरकारसाठी औपचारिक राजीनामामुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शुक्रवारी त्यांच्या मंत्रिमंडळासह नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा करण्यासाठी राजीनामा दिला. पटेल यांनी गांधीनगर येथील राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला.

मुकेश अग्निहोत्रींचेही नाव आले समोरमुकेश अग्निहोत्री यांचाही मुख्यमंत्रिपदावर दावा आहे. ते राज्याचे प्रभारी राजीव शुक्ला यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांना सुखविंदर सिंग सुख्खू यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. 

प्रतिभा सिंह म्हणाल्या...  निवडणूक वीरभद्र सिंह यांच्या नावावर लढवली गेली, त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी संधी द्यावी.

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेस