शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

काश्मीर खोऱ्यात 2 दहशतवाद्यांना कंठस्नान, पाकिस्तानी Let कमांडरचाही खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 08:35 IST

पाकिस्तानी एलईटी कमांडर एैयाज उर्फ अबू हुरैरासह दोन स्थानिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले.  

ठळक मुद्देकाश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांसोबत भारतीय सैन्य दलाच्या जवानांची धुमश्चक्री झाली आहे. त्यामध्ये जवानांकडून दोन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

श्रीनगर - उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयनं मोठा कट आखल्याचे समजते. त्यातच, आज पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चमकम झाली आहे. त्यामध्ये, दोन दशहतवाद्यांना कंठस्नान देण्यात आलं आहे. 

काश्मीर खोऱ्यातील पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांसोबत भारतीय सैन्य दलाच्या जवानांची धुमश्चक्री झाली आहे. त्यामध्ये जवानांकडून दोन दशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिली. अद्याप या दहशतवाद्यांची ओळख पटली नाही. मात्र, जवानांकडून अजूनही शोधमोहीम सुरूच आहे. पाकिस्तानी एलईटी कमांडर एैयाज उर्फ अबू हुरैरासह दोन स्थानिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचे काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी सांगितले.   काश्मीर खोऱ्यात सातत्याने दहशतवादी कारवाया सुरु आहेत. पण, भारतीय सैन दलाकडून या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यात येते. या कारवायांना पाकिस्तानकडूनच पाठबळ मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे.  दरम्यान, स्वातंत्र्य दिनी किंवा त्याच्या आसपास लखनऊसह महत्त्वाच्या शहरांमध्ये घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दहशतवाद्यांना दोनच दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आलं. यानंतर आता आयएसआयचा आणखी एक प्लान समोर आला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आयएसआयच्या निशाण्यावर आहेत. या गाड्यांमधून मोठ्या संख्येनं मजूर प्रवास करतात. या ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळेच या गाड्यांना लक्ष्य करण्याचा प्लान आयएसआयकडून आखण्यात आल्याची माहिती आहे.

पाकिस्तानातही टीटीपी दहशतावाद्यांचा हल्ला

पाकिस्तानच्या खैबर पख्युतख्वा प्रांतात दोन दिवसांपूर्वी मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कॅप्टन अब्दुल बासित यांच्यासह ११ सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर १५ पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी काही सैनिकांना ओलीस ठेवल्याची माहितीदेखील समोर येत आहे. तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं (टीटीपी) हा हल्ला केला असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरSrinagarश्रीनगरIndian Armyभारतीय जवान