शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या खिशात येणार २ लाख कोटी, जीएसटी २.० सुधारणांचा फायदा सर्वांना; टॅरिफचा फटका होणार कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 08:09 IST

नागरिकांनी खरेदीसाठी केली मोठी गर्दी; नवरात्रीच्या पहिल्या दिवशी वाहन विक्रीत जबरदस्त उसळी; नागरिकांची खरेदीची ताकद वाढल्याने अर्थव्यवस्थेला येणार गती

नवी दिल्ली : भारतातील ग्राहकांसाठी मोठा दिलासा देत जीएसटी २.० सुधारणा सोमवारपासून लागू झाली. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्याप्रमाणे या निर्णयामुळे १२ टक्क्यांच्या कर स्लॅबमधील ९० टक्क्यांहून अधिक वस्तू आता ५ टक्के स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची तब्बल २ लाख कोटी रुपयांची कर बचत होणार असून, हा पैसा लोकांच्या खिशात खुळखुळणार आहे. त्यामुळे जीएसटी कपातीच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.  

जीएसटी सुधारणेचा थेट परिणाम घरगुती खर्चावर दिसून येत आहे. अमूलने ७०० उत्पादनांचे दर कमी केले असून, तूप प्रति लिटर ४० रुपयांनी स्वस्त झाले आहे. मदर डेअरीने दुधाचे दर २ रुपयांनी कमी केले आहेत. औषधे आणि जीवन व आरोग्य विमा प्रीमियमवरील १८ टक्के जीएसटी हटवण्यात आला आहे.फ्रिज, वॉशिंग मशीन, टीव्ही यांसारखी गृहाेपयोगी उपकरणे ८ ते १० टक्क्यांनी, तर कार ८ ते ९ टक्क्यांनी व दुचाकी ६ ते ७ टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. सणासुदीच्या काळात या करकपातीमुळे खरेदीला मोठी चालना मिळेल, असा उद्योगक्षेत्राचा अंदाज आहे.

लोकांची क्रयशक्ती वाढणार ग्राहक खर्चाचे भारताच्या जीडीपीतील योगदान सुमारे ६० टक्के आहे. करकपातीमुळे महागाईचा दबाव कमी होऊन देशांतर्गत मागणी वाढेल आणि स्वदेशी उत्पादनाला बळ मिळेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सणासुदीच्या हंगामात ही सवलत मध्यमवर्गीय आणि ग्रामीण भागातील खरेदीशक्ती वाढवून अर्थव्यवस्थेला नवी गती देईल.

टॅरिफचा परिणाम कमी होईल : मूडीजमूडीजच्या मते, अमेरिकेच्या वाढलेल्या शुल्कांचा आणि जागतिक आव्हानांचा निर्यातीत होणारा परिणाम कमी जीएसटी दरांमुळे कमी होईल. तसेच, देशांतर्गत खप वाढेल. 

लोकांची सुमारे २.५ लाख कोटी रुपयांची बचत होईल. त्यामुळे घर बांधणे, गाडी खरेदी करणे, उपकरणे घेणे, बाहेर जेवण किंवा सहलीसारख्या इच्छा पूर्ण करणे सोपे होईल. स्वदेशी उत्पादनांना पाठिंबा द्यावा. आपण जे खरेदी करतो ते स्वदेशी, आपण जे विकतो तेही स्वदेशी असावे. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :GSTजीएसटी