शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

भारतीय रेल्वेत २ लाख ६३ हजार, तर गृह मंत्रालयात १ लाख जागा रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 07:11 IST

रेल्वेमध्ये २.३७ कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन १,३९,०५० उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत १,३६,७७३ उमेदवारांना विविध ‘गट क’ पदांखाली समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील १,११,७२८ पदांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये सध्या राजपत्रित आणि अराजपत्रित संवर्गातील २,६३,९१३ पदे रिक्त असून,  सीआरपीएफ, बीएसएफ यासारख्या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये १,१४,२४५ जागा रिक्त असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत कनिमोई करुणानिधी, एम सेल्वराज, कौशलेंद्र कुमार, पीआर नटराजन आणि हिबी इडेन यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारतीय रेल्वेमध्ये कर्मचाऱ्यांच्या तीव्र टंचाईची सरकारला जाणीव आहे का? असा प्रश्न सदस्यांनी विचारला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, १ जुलै २०२३ पर्यंत, रेल्वेमध्ये राजपत्रित संवर्गाची २,६८० पदे आणि अराजपत्रित संवर्गाची २,६१,२३३ पदे रिक्त आहेत. 

दीड लाख जागांसाठी भरती सुरूरेल्वेमध्ये २.३७ कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन १,३९,०५० उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत १,३६,७७३ उमेदवारांना विविध ‘गट क’ पदांखाली समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील १,११,७२८ पदांचा समावेश आहे.

कमतरता कुठे ? - केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांनी बुधवारी राज्यसभेत सांगितले की, २०२३ मध्ये सुमारे ३१,८७९ पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्यापैकी १,१२६ पदे भरण्यात आली आहेत. - केंद्रीय गृह मंत्रालय आणि त्याअंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, जसे की सीमा सुरक्षा दल, सशस्त्र सीमा बल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो-तिबेट सीमा पोलिस दल, आसाम रायफल्स आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि दिल्ली पोलिसांमध्ये सध्या सुमारे १,१४,२४५ जागा रिक्त आहेत.

जवानांचा जॉबला टाटा २०१८     १०,९४०२०१९     १०,३२३२०२०     ७,६९०२०२१     १२,००३२०२२     १२,३८०

पाच वर्षांत ५३,३३६ जवानांनी सोडली नोकरी- गेल्या पाच वर्षांत (२०१८ ते २०२२) ५३,३३६ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. - ४७ हजार सैनिकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. त्याच वेळी ६,३३६ जवानांनी राजीनामा दिला आहे. केंद्र सरकारने लोकसभेत ही माहिती दिली.

आत्महत्याही वाढल्या : २०१८ ते २०२२ दरम्यान एकूण ६५८ जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये २३० सीआरपीएफ, १७४ बीएसएफ, ९१ सीआयएसएफ, ६५ एसएसबी, ५१ आयटीबीपी आणि ४७ आसाम रायफल्सच्या जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. दर वर्षामध्ये आत्महत्या करणाऱ्या जवानांचे प्रमाण वाढत आहे.

नोकरी सोडण्याचे प्रमाण कुठे वाढले? बीएसएफ    २३,५५३सीआरपीएफ     १३,६४०सीआयएसएफ     ८० भारत तिबेट पोलिस     ३,१६५सशस्त्र सीमा दल     २,४३४

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेHome Ministryगृह मंत्रालयrailwayरेल्वेjobनोकरी