शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम बंगालमध्ये बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 07:56 IST

बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत असल्यानं मृतांची संख्या वाढण्याची भीती

मालदा: पश्चिम बंगालमधल्या मालदात बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू झाला आहे. या बोटीतून जवळपास ५० जण प्रवास करत होते. यापैकी २० जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर बाकीचे प्रवासी बेपत्ता आहेत. सध्या घटनास्थळी एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू आहे. अपघातग्रस्त झालेली बोट बिहारच्या कटिहारमधून पश्चिम बंगालमधल्या मालदाला जात होती. महानंदा नदीमध्ये बोट उलटल्यानं दोघांचा मृत्यू झाला. मालदा जिल्ह्यातल्या चंचल पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मुकूंदपूर घाट परिसरात पोहोचण्यापूर्वीच प्रवासी बोट उलटली. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. बोटीतून ५० जण प्रवास करत असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या घटनास्थळी वेगानं बचावकार्य सुरू आहे. बोटीतून प्रवास करणारे सर्वजण दिनाजपूरमध्ये बैच उत्सव पाहण्यासाठी चालले होते.  आतापर्यंत दोन प्रवाशांचे मृतदेह हाती लागले असून एकूण प्रवासी संख्या पाहता मृतांची संख्या वाढू शकते, अशी माहिती मालदाचे पोलीस अधीक्षक आलोक रजारिया यांनी दिली. गुरुवारी संध्याकाळी उशिरा ही घटना घडली. या बोटीत प्रवाशांसह सायकल आणि मोटारसायकलदेखील होत्या. याशिवाय बोटीतील प्रवाशांची संख्यादेखील जास्त होती. सध्या घटनास्थळी पूर्ण क्षमतेनं बचावकार्य सुरू असल्याचं रजारिया यांनी सांगितलं. 

टॅग्स :Accidentअपघात