शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'खराब हेअरकट'च्या बदल्यात २ कोटी! मॉडेलनं मागितली नुकसान भारपाई; सुप्रीम कोर्ट म्हणालं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 00:23 IST

केवळ अनुमानांच्या आधारावर, एवढी मोठी नुकसानभरपाई दिली जाऊ शकत नाही, अशी कठोर भूमिका घेत, न्यायालयाने भरपाईची रक्कम २५ लाख रुपयांवर आणली आहे...

एका मॉडेलला 'खराब हेअरकट'च्या मोबदल्यात नुकसान भरपाई पोटी २ कोटी रुपये द्यावेत, असे निर्देश राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) नवी दिल्ली येथील 'आयटीसी मौर्य' हॉटेलला दिले होते. मात्र, NCDRC चा हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा रद्द केला आहे. केवळ अनुमानांच्या आधारावर, एवढी मोठी नुकसानभरपाई दिली जाऊ शकत नाही, अशी कठोर भूमिका घेत, न्यायालयाने भरपाईची रक्कम २५ लाख रुपयांवर आणली आहे.

न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने ३४ पानांच्या निकालात म्हटले आहे की, भावनिक तर्क किंवा अनुमानांच्या आधारावर नुकसान भरपाई ठरवली जाऊ शकत नाही. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाने (NCDRC) दिलेला २ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा आदेश रद्द करत, न्यायालयाने ही रक्कम २५ लाख रुपयांवर आणली आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा दावा असताना आयोगाने पुराव्यांचे गंभीर परीक्षण करणे आवश्यक होते, असेही न्यायालयाने नमूद केले.

नेमकं प्रकरण काय? मॉडेल आणि मॅनेजमेंट प्रोफेशनल आशना राय दिल्लीतील आयटीसी मौर्य हॉटेलमधील सलूनमध्ये हेअरकटसाठी गेली होती. स्टायलिस्टने आपल्या सांगण्यापेक्षा अधिक केस कापले, असा तिचा आरोप होता. यामुळे त्यांना मानसिक धक्का बसला आणि त्यांच्या व्यावसायिक प्रतिमेचे नुकसान झाले. या घटनेमुळे मॉडेलिंग आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे प्रोजेक्ट्स हातचे गेल्याचा दावाही मॉडेलने केला होता.

पुराव्यांची आवश्यकता  कोर्ट म्हणाले, "ग्राहकाने मानसिक आघाताचा हवाला देऊन मूळ दस्तऐवज सादर न करणे, हा मोठ्या भरपाईचा आधार होऊ शकत नाही. ग्राहक आयोगांवर दिवाणी प्रक्रिया संहिता (CPC) कडकपणे लागू होत नसली, तरी पुराव्यांचे ठोस मूल्यमापन करणे अनिवार्य आहे. 

मानसिक आघाताचा हवाला देत मूळ दस्तावेज सादर करू न शकणे, हे मोठ्या नुकसान भरपाईचा आधार ठरू शकत नाही. एवढेच नाही तर, २ कोटींचे आर्थिक नुकसान नेमके कसे सिद्ध होते? हे स्पष्ट करण्यात आयोग अपयशी ठरल्याचे, न्यायालयाने म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Supreme Court Reduces Model's Compensation for 'Bad Haircut' to $30,000

Web Summary : The Supreme Court slashed a model's $240,000 compensation for a 'bad haircut' at a Delhi hotel salon to $30,000. The court criticized the initial award as based on speculation, emphasizing the need for concrete evidence, not emotional reasoning, to justify such high damages.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय