शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मोटर वाहन कायद्याद्वारे केली ५७७ कोटींची दंडवसुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 06:53 IST

नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर देशातील १८ राज्यांत नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांनी ५७७.५ कोटींचा दंड वसूल केला.

नवी दिल्ली : नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर देशातील १८ राज्यांत नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतूक पोलिसांनी ५७७.५ कोटींचा दंड वसूल केला. त्यातील २०१.९ कोटी रुपयांचा सर्वात मोठा वाटा उत्तर प्रदेशचा असून त्यानंतर गुजरात, बिहारचा क्रमांक लागतो. देशात सर्वात कमी दंडवसुली गोव्यामध्ये झाली असून ती ७८०० रुपये इतकी आहे.महाराष्ट्रामध्ये वाहतूकीचे नियम मोडणाºया ६४१६ जणांना ४.१६ लाख रुपये दंड आकारण्यात आला. नवा मोटर वाहन कायदा लागू न केलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. नव्या कायद्यानुसार दंडाची रक्कम वाढविण्यात आलेली असली तरी महाराष्ट्रात अजून तो बदल झालेला नाही.लोकसभेमध्ये यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, न्यायालयाला सादर केलेल्या चलानांमधील रकमेची बेरीज करून दंड आकारणीचा आकडा देण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्षात किती दंडवसुली केली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.नवीन मोटर वाहन कायदा लागू झाल्यानंतर त्यातील तरतुदीनुसार प्रत्येक गुन्ह्याकरिता जो सर्वोच्च दंड आहे त्यानुसार वाहतूक पोलिसांनी चलान जारी केली. दंडाच्या मोठ्या रकमेमुळे त्याला देशभरात जोरदार विरोधही सुरू झाला. परिणामी गुजरात, उत्तराखंड, तामिळनाडू या राज्यांनी दंडाची रक्कम कमी केली.एखादे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी करत नसल्याचा एकही अहवाल आमच्या खात्याकडे आलेला नाही असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगत असले तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुधारित दंडाच्या रकमेबाबत अनेक राज्यांनी अद्याप अधिसूचना जारी केलेली नाही.अपघात झाले कमीभूपृष्ठ वाहतूक खात्याने म्हटले आहे की, नव्या मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर यंदा सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. या कालावधीत यंदा उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात आतापर्यंत १,३५५ माणसे मरण पावल्याचे दिसून आले. हेच प्रमाण तिथे गेल्या वर्षी १५०३ इतके होते.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षा