शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
3
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
4
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
5
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
6
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
7
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
8
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
9
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
10
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
11
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
12
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
14
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
15
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
16
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
17
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
18
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
19
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
20
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल

पहलगाम हल्ल्यानंतर २ आदिलची जगभरात चर्चा; एकाने छातीवर गोळ्या झेलल्या, दुसऱ्याने...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 07:40 IST

पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांत मोठ्या हल्ल्यात पाच ते सात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळ्या चालवल्या. त्यांना पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या किमान दोन स्थानिक अतिरेक्यांनी मदत केली. फरार असलेला आदिल त्यापैकीच एक आहे.

श्रीनगर - पहलगाममधील परस्परविरोधी प्रवाहातील दोन आदिलची सध्या संपूर्ण जगभरात चर्चा आहे. एकाने पर्यटकांना वाचवताना आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या आणि दुसऱ्याने निरपराध पर्यटकांवर निर्दयीपणे गोळ्या झाडल्या. आदिल ठोकर ऊर्फ आदिल गुरी हा लष्कर-ए-तैयबाचा अतिरेकी आहे तर सय्यद आदिल हुसेन शाह हा धाडसी होता. 

तिरस्कारास पात्र आदिल; अशी पटली ओळखबैसरन घाटीमध्ये झालेल्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी आदिलचे घर एका स्फोटात उद्ध्वस्त झाले. हा स्फोट कशामुळे झाला, हे स्पष्ट नसले तरी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली असताना तेथे आधीच असलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. २०१८ मध्ये तो वैध प्रवास दस्तावेजावर पाकिस्तानला गेला. तेव्हा तो किशोरवयीन होता व नंतर तो बेपत्ता झाला. त्यानंतर तो लष्कर-ए-तैयबा या अतिरेकी संघटनेत सामील झाल्याचे वृत्त आले. २०२० मध्ये तो नियंत्रण रेषेवरून भारतात परतला व जम्मू-काश्मीरच्या डोडा व किश्तवार भागात सक्रिय राहिला.

पुलवामा हल्ल्यानंतर सर्वांत मोठ्या हल्ल्यात पाच ते सात अतिरेक्यांनी पर्यटकांवर गोळ्या चालवल्या. त्यांना पाकमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या किमान दोन स्थानिक अतिरेक्यांनी मदत केली. फरार असलेला आदिल त्यापैकीच एक आहे. ठार करण्यात आलेल्या पर्यटकांपैकी एका पर्यटकाच्या पत्नीने त्याची ओळख पटवली. त्या महिलेला सहा-सात फोटो दाखवण्यात आले. त्यापैकी आदिल हा ट्रिगर दाबणारा दहशतवादी म्हणून ओळख पटवण्यात आली. हल्ल्यानंतर बंदूकधारी पीर पंजालच्या घनदाट जंगलात फरार झाले.  दक्षिण काश्मीरमधील बिजबेहरा येथील गुरी गावातील रहिवासी आदिल ठोकर हा विशीच्या आतील आहे.

पर्यटकांसाठी गोळ्या झेललेला आदिलकुटुंबातील एकमेव कमाई करणारा आदिल पर्यटकांची सहा किलोमीटर अंतरावर पहलगाम शहरापासून विस्तीर्ण हिरव्या कुरणात ने-आण करीत होता. सय्यद नौशाद म्हणाले की, एका मृत पर्यटकाच्या मुलाने मला माझ्या भावाच्या शौर्याबाबत सांगितले. अतिरेक्याने आदिलच्या छातीत तीन गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात ठार झालेला तो एकमेव काश्मिरी आहे.

आदिलची बहीण अस्मा म्हणाली की, मला सकाळपासून अज्ञात भीतीने ग्रासले होते. मी त्याला सकाळीच म्हणाले होते, आज काहीतरी वाईट घडणार असे वाटतेय. पण त्याने माझे ऐकले नाही आणि निघून गेला. तो इतरांसाठी मदत करायला नेहमी पुढे असायचा. आदिलचे शोकसंतप्त वडील म्हणाले की, माझ्या मुलांपैकी सर्वांत दयाळू आदिल होता आणि तोच राहिला नाही. माझ्या मुलाने हत्येला विरोध केला म्हणून अतिरेक्यांनी त्याला मारले. तो संध्याकाळी परतला नाही, तेव्हा आम्ही त्याला फोन करायला सुरुवात केली. परंतु फोन कोणीही उचलला नाही. गावकऱ्यांनी या कुटुंबाला संकटाच्या काळात एकटे सोडले नाही. त्याच्या अंत्ययात्रेला शेकडो लोक आले होते. 

सीमा हैदरसह इतर नागरिकांची होणार पाकिस्तानला रवानगीपहलगाममधील हल्ल्यानंतर केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार पाकिस्तानी नागरिक मायदेशात रवाना होत आहेत. उत्तर प्रदेशातून १८०० पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविले जाणार आहे. आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी व्हिसा घेऊन ते भारतात आले होते. शरणार्थी म्हणून राहात असलेल्या सीमा हैदर हिचीदेखील पाकिस्तानात आता रवानगी करण्यात येईल. उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात सध्या वास्तव्यास असलेल्या १८०० पाकिस्तानी नागरिकांना रविवारी  पाकिस्तानला परत पाठविण्यात येणार आहे.  सीमा हैदर ही एक पाकिस्तानी नागरिक असून, तिने २०२३ मध्ये नेपाळमार्गे बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केला होता.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndiaभारत