शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तिरुपती देवस्थानकडे २.५ लाख कोटींची संपत्ती! १० टन सोने तर १६ हजार कोटी रोख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 07:44 IST

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानाकडे २.५ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये १० टनांहून अधिक सोने व १५९०० कोटी रुपयांच्या रकमेचाही समावेश आहे.

तिरुपती :

देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानाकडे २.५ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यामध्ये १० टनांहून अधिक सोने व १५९०० कोटी रुपयांच्या रकमेचाही समावेश आहे. तिरुपती येथे असलेल्या श्रीवेंकटेश्वराचे जगभरात कोट्यवधी भाविक आहेत. त्यांच्याकडून येणाऱ्या देणग्या तसेच दान केले जाणारे सोन्याचांदीचे, हिऱ्यांचे दागदागिने व अन्य जडजवाहिर यामुळे इतकी संपत्ती या देवस्थानाकडे जमा झाली आहे. २०१९ साली तिरुपती देवळाकडे १३,०२५ कोटी रुपयांच्या मुदतठेवी व ७.३ टन सोने होते. आता तीन वर्षांनी त्यात मोठी वाढ झाली आहे. या देवस्थानने त्याच्याकडील एकूण संपत्तीची माहिती रविवारी जाहीर केली.

सोन्याचा हिशेब नेमका असा...तिरुपती देवस्थानने त्याच्याकडे असलेल्या १०.२५ टन सोन्यापैकी ९.८ टन सोने स्टेट बँक ऑफ इंडियाकडे (एसबीआय) तर बाकीचे सोने इंडियन ओव्हरसीज बँकेत ठेवले आहे. या देवस्थानकडून महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, तेलंगणा, ओडिशा, हरयाणा, आंध्र प्रदेश येथील अनेक मंदिरांची देखभाल केली जाते. 

अशी आहे तिरुपती देवस्थानाकडील संपत्ती१५,९३८ कोटी रुपये रकमेच्या मुदतठेवी खाजगी, सरकारी बँकांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.१०.२५ टन सोने बँकेत ठेवले आहे.३,१०० कोटी रुपये इतके वार्षिक बजेट तिरुपती देवस्थानने २०२२-२३ या कालावधीसाठी सादर केले. ६६८ कोटी रुपये मुदतठेवींवरील व्याजाच्या रूपाने मिळतात.१,००० कोटी रुपये मिळतात भाविकांनी दानपेटीत अर्पण केलेल्या रोख रकमेतून७,००० एकर जमीन देवस्थानच्या मालकीची असून ९०० स्थावर मालमत्ता तिरुपती देवस्थानच्या मालकीच्या आहेत. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट