शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! मुलांसाठीही आली Covid 19 लस; Zydus Cadila च्या लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 20:57 IST

Coronavirus Vaccine for Children in India : १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या मुलांना देता येणार झायडस कॅडिलाची लस. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ़ इंडियाने आपात्कालिन वापरासाठी दिली मंजुरी.

ठळक मुद्दे १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या मुलांना देता येणार झायडस कॅडिलाची लस. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ़ इंडियाने आपात्कालिन वापरासाठी दिली मंजुरी.

सध्या देशात कोरोना संसर्ग कमी होताना दिसत असला तरी धोका मात्र पूर्णपणे टळलेला नाही. परंतु यादरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. देशात आता १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील मुलांचंही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलं जाणार आहे.  ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ़ इंडियानं झायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली आहे. ही जगातील पहिली भारतात तयार झालेली लस आहे जी डीएनए वर आधारित आहे. ही लस वयस्क लोकांसह १२ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लोकांनाही देण्यात येणार आहे.

ZyCoV-D कोरोनाच्या विरोधातील पहिली अशी लस असेल जी डीएनए लस असेल आणि कोणत्याही भारतीय कंपनीद्वारे विकसित करण्यात आली आहे. ही देशातील सहावी कोरोना प्रतिबंधात्मक लस ठरली आहे. यापूर्वी देशात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक व्ही, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसींना मंजुरी देण्यात आली होती. समोर आलेल्या माहितीनुसार जेनेरिक औषध उत्पादक कंपनी कॅडिला हेल्थकेअल लिमिटेडनं ZyCoV-D लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी दिली आहे. कंपनीनं यासाठी १ जुलै रोजी अर्ज केला होता.  यापूर्वी या लसीची जवळपास २८ हजार स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ही लस ६६.६ टक्के प्रभावशाली असल्याचं सांगण्यातआलं. समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना विषाणूच्या विरोधात लढणारी पहिली प्लाझ्मा डीएनए लस आहे. यामध्ये विषाणूच्या काही घटकांचा वापर केला जातो. याद्वारे डीएनए अथवा आरएनएला सूचना दिली जाते जेणेकरून प्रोटिन तयार होईल आणि इम्युन सिस्टम वाढेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत