नवी दिल्ली: १९८४ च्या शिखविरोधी दंगलीशी संबंधित जनकपुरी आणि विकासपुरी हिंसाचार प्रकरणात दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू कोर्टाने माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या हिंसाचारात दोन लोकांचा मृत्यू झाला होता. ठोस पुराव्यांच्या अभावी न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.
१९८४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात शिखविरोधी दंगली उसळल्या होत्या. दिल्लीतील जनकपुरी आणि विकासपुरी भागात झालेल्या हिंसाचारात दोन शिख व्यक्तींची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सज्जन कुमार यांच्यावर जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप होता. मात्र, सुनावणी दरम्यान सज्जन कुमार यांनी आपण निर्दोष असल्याचे आणि या हिंसाचारात आपला कोणताही सहभाग नसल्याचे वारंवार सांगितले होते.
न्यायालयाचे निरीक्षणराऊज एव्हेन्यू कोर्टाने आज (२२ जानेवारी २०२६) आपला निकाल सुनावताना स्पष्ट केले की, आरोपींविरुद्ध सबळ पुरावे सादर करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले आहे. पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने सज्जन कुमार यांना या प्रकरणातून मुक्त केले आहे.
सज्जन कुमार यांची सद्यस्थितीजरी या प्रकरणात त्यांची सुटका झाली असली, तरी सज्जन कुमार सध्या दुसऱ्या एका दंगल प्रकरणात (राज नगर मधील पाच लोकांची हत्या) जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. २०१७ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना त्या प्रकरणात दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
Web Summary : Sajjan Kumar, former Congress leader, acquitted in 1984 anti-Sikh riots case due to lack of evidence. He still serves life sentence in another riot case.
Web Summary : कांग्रेस के पूर्व नेता सज्जन कुमार को 1984 के सिख विरोधी दंगों के मामले में सबूतों के अभाव के कारण बरी कर दिया गया। वह अभी भी दूसरे दंगा मामले में आजीवन कारावास की सजा काट रहे हैं।