शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

“पाकिस्तानात झोपलो होतो, सकाळी डोळे उघडताच अख्खं गाव भारताचा भाग बनलं”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 17:09 IST

जेव्हा युद्ध संपलं तेव्हा पत्नी त्यांच्या पतीपासून, वडील त्यांच्या मुलापासून आणि भाऊ भावापासून वेगळे झाले होते.

नवी दिल्ली – श्योक नदीच्या काठापासून अवघ्या ३० मिनिटांचा रस्ता आहे परंतु ८६ वर्षीय हाजी शमशेर अली मागील ५० वर्षापासून हे अंतर पार करु शकले नाहीत. सीमेपलीकडेच पाकिस्तानच्या गिलगित-बाल्टिस्तान भागात हाजी अलीचा छोटा भाऊ हाजी अब्दुल कादीर राहतात. या दोन्ही भावांमध्ये दुरावा नशिबाने लिहिला आहे. १६ डिसेंबर १९७१ च्या सकाळी विजयाच्या बातमीसोबतच नवीन देश बनल्याची माहिती समोर आली. सकाळी डोळे उघडताच ते पाकिस्तानात नाहीत असं त्यांना कळालं.

रातोरात नियंत्रण रेषा बदलली होती त्यासोबतच ३५० कुटुंबाचं आयुष्यही बदललं. तुतुर्क आणि लडाखच्या नुब्रा खोऱ्यात ३ आणखी गावं जी १९४७ मध्ये पाकिस्तानच्या ताब्यात होती. ते भारताचा भाग बनले होते. अलीचा मुलगा हुसैन गुल्ली एक ट्रव्हल एजेंट आहे. त्याने सांगितले की, त्यावेळी मी तरुण होतो. शिक्षणासाठी मी लाहौरला जायचो. गावात खुप कमी लोकं होती. त्यात वुद्ध आणि लहान मुलं जास्त होती. जेव्हा युद्ध संपलं तेव्हा पत्नी त्यांच्या पतीपासून, वडील त्यांच्या मुलापासून आणि भाऊ भावापासून वेगळे झाले होते. अली यांचे भाऊ कादिर युद्धावेळी स्कार्दू येथे कामाला गेले होते असं त्यांनी सांगितले.

त्या आठवणींना उजाळा देताना गुल्ली म्हणाले. सुरुवातीला आम्ही जिवंत आहोत की नाही हेच कळत नव्हतं. माझी पत्नी, काकी माझ्यासोबत होती. आम्हाला त्यांची प्रतिक्षा करावी लागली. त्यानंतर स्कार्दूच्या रेडिओवर एका कार्यक्रमात कादीरचं नाव घेतलं गेले. ते ऐकून आमच्या जीवाला शांती मिळाली. रेडिओ पकडून आम्ही खूप रडलो. ही सीमा आमच्या मनावर कोरली गेली. त्यानंतर पत्र, भेटीसाठी खूप काळ वाट पाहावी लागली. दोन्ही देशांकडून व्हिसा मिळणं खूप कठीण होतं. अनेकदा कुटुंबातील जन्म-मृत्यूची बातमीही मिळण्यास वर्ष लोटत होती. अखेर १९८९ मध्ये मक्का येथे दोन्ही भाऊ एकमेकांना हज यात्रेच्या निमित्ताने भेटले.

अलविदा म्हणणं खूप कठीण

४९ वर्षीय फाजिल अब्बास नशिबवान निघाले. त्यांचे मोठे बंधू मोहम्मद बशीर जे त्यावेळी पाकिस्तानात शिक्षण घेत होते. २०१३ मध्ये व्हिसा घेऊन भारतात आले. अब्बास सांगतात की, माझे वडील वाट पाहत निघून गेले परंतु आईला तिच्या छोट्या मुलाला भेटता आले. मी ४२ वर्षानंतर पहिल्यांदा भावाला भेटलो. बशीरच्या स्वागतासाठी गाव सजलं होतं. आम्ही खूप आनंदात होतो. तो २ महिने थांबला आणि पुन्हा निघाला तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान