१९... रेती
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
(फोटो)
१९... रेती
(फोटो)२८ लाखांचा मुद्देमाल जप्तजिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक : चार ट्रॅक्टरसह ट्रक व टिप्पर पकडलाखापा/मौदा : जिल्ह्यात रेतीचे अवैध उत्खनन व वाहतूक सुरू असताना सावनेर तालुक्यातील खापा, मौदा तालुक्यातील अरोली आणि पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईमध्ये एकूण आठ ब्रास रेतीसह या रेतीची अवैध वाहतूक करणारे चार ट्रॅक्टर, एक ट्रक व एक टिप्पर पकडला. यात तिघांना अटक करण्यात आली असून, तिघे फरार आहेत. ही कारवाई सोमवारी सायंकाळी व मंगळवारी सकाळी करण्यात आली.सावनेर तालुक्यातील खापा परिसरात रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती खापा पोलिसांना मंगळवारी सकाळी मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी खापा परिसरातील मालवाहू वाहनांवर नजर ठेवली होती. दरम्यान, पोलिसांना आढळून आलेल्या एमएच-४०/एलएम-३२, एमएच-४०/एल-५११७ आणि एमएच-४०/एल-२४८५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये रेती असल्याचे निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी तिन्ही ट्रॅक्टर अडवून कागदपत्रांची तपासणी केली. त्यास सदर रेतीची वाहतूक ही विनारॉयल्टी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी तिन्ही ट्रॅक्टरसह तीन ब्रास रेती जप्त केली. ही रेती नजीकच्या कन्हान नदीच्या पात्रातून आणली जात होती. या कारवाईमध्ये नऊ हजार रुपये किमतीच्या रेतीसह एकूण नऊ लाख नऊ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केल्याची माहिती पेालिसांनी दिली. याप्रकरणी खापा पोलिसांनी ट्रॅक्टरचालक पिंटू ऊर्फ ऋषिकर सुधाकर खुबाळकर (२३), गौरीशंकर रामदयाल भलावी (२०) आणि मदन सीताराम परतेती (३२) तिघेही रा. खापा, ता. सावनेर यांना अटक केली.मौदा तालुक्यातील कोदामेंढी परिसरातून रेतीची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच अरोली पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-४०/एल-९९७६ क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये रेती असल्याची शंका आल्याने पोलिसांनी सदर ट्रॅक्टर थांबविण्याचा इशारा केला. त्यातच ट्रॅक्टरचालक पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर सोडून पळून गेला. त्यामुळे ट्रॅक्टरचालकाचे नाव कळू शकले नाही. या कारवाईमध्ये पोलिसांनी दोन हजार रुपये किमतीच्या एक ब्रास रेतीसह एम लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.