शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा दलांशी चकमकीत १८ नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांमध्ये ११ महिला नक्षली, मोठा शस्त्रसाठा केला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 06:07 IST

Encounter In Chhattisgarh: छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी १८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये ११ महिला नक्षलवादी व २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेला एक नक्षलवादी यांचा समावेश आहे.

सुकमा - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी १८ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये ११ महिला नक्षलवादी व २५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आलेला एक नक्षलवादी यांचा समावेश आहे. या चकमकीत त्यावेळी डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्डचे तीन, राज्य पोलिसांचा एक असे चार जवान जखमी झाले. केरलपल पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात ही चकमक झाली, असे बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले.

या भागात शनिवारी काही तास ही चकमक सुरू होती. घटनास्थळी १८ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. केरपलच्या जंगलात नक्षलवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीआरजी, राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकांनी शुक्रवारी रात्री या भागाला वेढा दिला आणि नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली. शनिवारी सकाळी आठ वाजता नक्षलवादी, सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू झाली. त्यावेळी ठार झालेल्या नक्षलवाद्यांपैकी सात जणांची ओळख पटली आहे. त्यातील कुहदामी जगदीश उर्फ बुध्रा या नक्षलवाद्याला पकडण्यासाठी पोलिसांनी २५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. दरभा विभागातील नक्षलवाद्यांच्या  विशेष विभागीय समितीचा सदस्य व सचिव असलेला जगदीश अनेक गुन्ह्यांसाठी पोलिसांना हवा होता. 

ठार झालेल्या नक्षलवाद्यांकडून एके-४७ रायफली, सेल्फ-लोडिंग रायफल, ३०३ रायफल, रॉकेट लॉंचर, बॅरल ग्रेनेड लॉंचर आणि दारूगोळा आदी जप्त केले आहे. (वृत्तसंस्था) 

१५ नक्षलवाद्यांची शरणागतीछत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात शनिवारी १५ नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलासमोर शरणागती पत्करली. ही माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.या नक्षलवाद्यांपैकी सिक्का ऊर्फ भीमा मांडवी हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) या संघटनेचा पदाधिकारी होता. नक्षलवादी विचारसरणीतील फोलपणा लक्षात आल्याने त्यांनी शस्त्रे खाली ठेवून शरणागती पत्करली असे पोलिसांनी सांगितले. 

दंतेवाडात जून २०२० पासून नक्षलवाद्यांविरोधातील मोहीम अधिक वेगाने राबविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत २९२७ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करून ते मुख्य प्रवाहात सामील झाले.

शांतता, विकास हेच बदल घडवू शकतात : अमित शाहशस्त्रास्त्रे, हिंसाचाराच्या बळावर कोणताही बदल घडविता येत नाही. शांतता व विकास या दोन गोष्टीच मोठे बदल घडवू शकतात असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. छत्तीसगडमध्ये शनिवारी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाले. हा नक्षलवादावर केलेला आणखी एक प्रहार आहे, असेही शाह यांनी म्हटले आहे. ३१ मार्च २०२६पर्यंत देशातून नक्षलवादाचा समूळ नायनाट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ठरविले आहे. त्याचा पुनरुच्चारही केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगड