शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

अण्णाद्रमुकतील टीटीव्ही दिनकरन गटाचे १८ आमदार अपात्र, मुख्यमंत्र्यांचे गणित सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 04:07 IST

मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांचा पाठिंबा काढून घेणा-या सत्ताधारी अण्णाद्रमुकतील टीटीव्ही दिनकरन गटाच्या १८ आमदारांना तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी अपात्र ठरविले. विधानसभा सचिवांनी हा निर्णय जाहीर करताना म्हटले की, या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आले आहे.

चेन्नई : मुख्यमंत्री ई पलानीस्वामी यांचा पाठिंबा काढून घेणा-या सत्ताधारी अण्णाद्रमुकतील टीटीव्ही दिनकरन गटाच्या १८ आमदारांना तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी अपात्र ठरविले. विधानसभा सचिवांनी हा निर्णय जाहीर करताना म्हटले की, या आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये अपात्र ठरविण्यात आले आहे.या आमदारांनी पक्ष सोडलेला नाही, ते दुसºया पक्षात गेलेले नाहीत किंवा पक्षादेशाविरुद्ध मतदानही केलेले नाही. तरीही त्यांच्याविरुद्ध पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा उगारला गेल्याने वाद होण्याची शक्यता आहे. अद्रमुकच्या मुख्य प्रतोदांच्या फिर्यादीवर अध्यक्षांनी १९ आमदारांना अपात्रतेची नोटीस काढली. त्यापैकी एक आमदार मुख्यमंत्र्यांच्या गटात आल्याने, त्याच्याविरुद्धची फिर्याद मागे घेण्यात आली होती.या अपात्रतेमुळे अण्णाद्रमुकमधील यादवीला नवा रंग चढणार आहे. पलानीस्वामी व पनीरसेल्वम गटांनी एकत्र येऊन, तुरुंगात असलेल्या शशिकला व त्यांच्या कुटुंबीयांना पक्षातून हाकलून दिले, परंतु पक्षाचे २१ आमदार मात्र शशिकला यांचे भाचे टीटीव्ही दिनकरन यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने पलानीस्वामी सरकारकडे बहुमत नाही, अशी स्थिती निर्माण झाली.२३४ सदस्यांच्या विधानसभेत पलानीस्वामी यांना बहुमतासाठी ११७ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे, परंतु फक्त १०८ आमदार त्यांच्याकडे आहेत. मुख्यमंत्र्यांकडे बहुमत नाही. त्यामुळे त्यांना विधानसभेत लगेच बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी दिनकरन गट व विरोधी द्रमुकने राज्यपालांकडे अनेक वेळा केली, पण ती मान्य झालेली नाही.या १८ आमदारांना अपात्र न ठरविता, विधानसभेत शक्तिप्रदर्शन घेतले, तर पलानीस्वामी सरकारचा पराभव झाला असता. या आमदारांखेरीज द्रमुकचे ८९, काँग्रेसचे आठ व मुस्लीम लीगचा १असे मिळून ११६ आमदार त्यांच्या विरोधात होते. दिवंगत जे. जयललिता यांची जागा रिकामी आहे.त्यामुळे आता या १८ आमदारांचे सदस्यत्व रद्द झाल्याने, सभागृहाची सदस्यसंख्या २१५ वर येईल व१०८ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सिद्ध करणे पलानीस्वामी सरकारला सुकर होईल.>कोर्टकज्ज्याचे संकेतअध्यक्षांच्या या निर्णयास न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे दिनकरन गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मद्रास उच्च न्यायालयानेही ही संभाव्य अपात्रता लक्षात घेऊनच, विधानसभेत २० सप्टेंबरपर्यंत शक्तिप्रदर्शन घेण्यास बंदी केली आहे.ही तारीख उलटताच, लगेच शक्तिप्रदर्शनासाठी विधानसभेचे अधिवेशन घ्यायचे, असे मुख्यमंत्र्यांची खेळी आहे, परंतु त्या आधीच हे अपात्रतेचे प्रकरण न्यायालयात गेल्यास तिढा वाढू शकतो.