शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१७७ काश्मिरी पंडितांच्या जिल्हा मुख्यालयात बदल्या; ‘टार्गेट किलिंग’च्या घटनांनंतर सरकारचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 06:55 IST

Target Killing : सातत्याने होणाऱ्या या ‘टार्गेट किलिंग’मुळे पंडितांत तीव्र असंतोष आहे. तो कमी करण्यासाठी बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे.

श्रीनगर : काश्मिरात अतिरेकी वेचून-वेचून काश्मिरी पंडितांच्या हत्या करीत असल्यामुळे १७७ शिक्षक पंडितांच्या जिल्हा मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयात शुक्रवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीनगरच्या मुख्य शिक्षण अधिकाऱ्यांनी एक पत्र जारी करून शिक्षकांच्या बदलीची माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांना वेचून-वेचून ठार मारले जात आहे. सातत्याने होणाऱ्या या ‘टार्गेट किलिंग’मुळे पंडितांत तीव्र असंतोष आहे. तो कमी करण्यासाठी बदलीचा निर्णय घेण्यात आला आहे.

३१ मार्च रोजी सांबा येथील शिक्षिका रजनी बाला यांची अतिरेक्यांनी त्यांच्या शाळेबाहेर गोळ्या घालून हत्या केली होती. तेव्हापासून काश्मिरी पंडित बदलीची मागणी करीत आहेत. अनंतनागमधील मट्टन येथील रहिवासी असलेले काश्मिरी पंडित रंजन ज्योतिषी यांनी सांगितले की, आमच्या संयमाचा बांध आता तुटला आहे. 

आमचे कित्येक लोक मारले गेले आहेत. सरकारला आमच्याकडून काय हवे आहे? येथे सुरक्षा दलांचे लोकच सुरक्षित नाहीत, तर आम्ही कसे सुरक्षित राहणार? आपल्याला काश्मीरमधून बाहेर काढून जम्मूत हलविण्यात यावे, अशी मागणी पंडितांकडून केली जात आहे.प्राप्त माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात ५९०० हिंदू कर्मचारी आहेत. त्यातील १,१०० जण संक्रमण शिबिरांत राहतात. ४,७०० लोक खासगी निवासस्थानी राहतात. यातील ८० टक्के कर्मचारी आधीच काश्मीर सोडून जम्मूत आश्रयास आले आहेत. अनंतनाग, बारामुल्ला आणि श्रीनगर येथील संक्रमण शिबिरातील कित्येक परिवार पोलीस-प्रशासनाच्या पहाऱ्यामुळे तेथे अडकून पडले आहेत.

यादी व्हायरल झाल्यामुळे चिंता वाढलीबदल्या करण्यात आलेल्या शिक्षक पंडितांची यादी समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, त्यावर काश्मीर भाजपने आक्षेप घेतला आहे. बदल्यांची यादी व्हायरल झाल्यामुळे कोणाला कोठे पोस्टिंग मिळाली, याची माहिती अतिरेक्यांना सहजपणे मिळेल. यादी व्हायरल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे भाजप प्रवक्ता अल्ताफ ठाकूर यांनी म्हटले आहे.

चकमकीत हिजबुलचा कमांडर ठारजम्मू-काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या भीषण चकमकीत शनिवारी हिजबुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर ठार झाला, तर तीन लष्करी जवान आणि एक नागरिक असे चार जण जखमी झाले. निसार खांडे असे मृत अतिरेक्याचे नाव आहे. त्याच्याकडून १ एके ४७ रायफल आणि स्फोटके यांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अनंतनाग जिल्ह्यातील रिशीपोरा भागात शुक्रवारी सायंकाळी चकमकीला तोंड फुटले. जखमींना श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर