शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या निधीसाठी १७.५० हजार कोटी रुपये; सर्वपक्षीय दबावामुळे केंद्राचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 09:26 IST

आपल्या मतदारसंघातील विकास कामांवर प्रत्येक खासदाराला या निधीतून दरवर्षी पाच कोटी रुपये खर्च करता येतील.

-हरिश गुप्तानवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांतील सर्व पक्षांच्या ७८० खासदारांच्या दबावापुढे झुकून अखेर केंद्र सरकारने स्थानिक विकासासाठी असलेल्या खासदार निधीची योजना  कायम राखण्याचा तसेच त्या योजनेकरिता पुढील पाच वर्षांसाठी १७,४१७ कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. खासदारांसाठी केलेल्या निधीची तरतूद तातडीने अमलात येणार असून, ती २०२५-२६ पर्यंत लागू राहील, असे केंद्रीय मंत्रिमंडळाने म्हटले आहे.

आपल्या मतदारसंघातील विकास कामांवर प्रत्येक खासदाराला या निधीतून दरवर्षी पाच कोटी रुपये खर्च करता येतील. खासदाराने या पैशातून केलेल्या विकासकामांचा तपशील सादर करायचा आहे. तो समाधानकारक असेल, तरच निधीचा दुसरा हप्ता त्याला दिला जाईल. मात्र २०२१-२२ या वित्तीय वर्षातील द्यावयाची उर्वरित प्रत्येकी २ कोटी रुपयांची रक्कम खासदाराला या वर्षात एकाच हप्त्यात दिली जाणार आहे. खासदाराने आपल्या मतदारसंघात पिण्याचे पाणी, प्राथमिक शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आदी कामे या निधीतून मार्गी लावावीत, अशी खासदार निधीची संकल्पना आहे.

५४ हजार कोटी खर्च

खासदार निधी योजना सुरू झाल्यापासून त्यातील पैशातून आजवर १९ लाख ८६ हजार २०६ विकासकामे पूर्ण झाली. त्यासाठी ५४१७१.०९ कोटी रुपये खर्च झाले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या कारकीर्दीत १९९३ मध्ये स्थानिक विकासासाठी खासदार निधीची योजना सुरू झाली. मात्र ही योजना म्हणजे पैशांचा चुराडा असल्याची टीका भाजपने केली होती.

 

टॅग्स :Member of parliamentखासदारCentral Governmentकेंद्र सरकार