शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

१७ जवान शहिद तर चार पाकिस्तानी दहशतवादी यमसदनी

By admin | Updated: September 18, 2016 13:11 IST

बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावरील दहशतवादयाच्या हल्लात १७ जवान शहीद झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत

काश्मीर, दि. १८ : बारामुल्ला येथील भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावरील दहशतवाद्याच्या हल्लात १७ जवान शहीद झाले आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय जवानांना यश आले आहे. मारले गेलेले दहशतवादी पाकिस्तानचे असल्याचे समजते. लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयाच्या जवळ सैनाकांनी घेराव घातला आहे. लष्काराच्या मदतीसाठी पॅराकंमाडोंना पाचारण करण्यात आलं होतं. 

बारामुल्ला येथील सीमेला लागून असलेल्या भारतीय लष्कराच्या उरी ब्रिगेड मुख्यालयावर दहशतवादयांने आत्मघातकी हल्ला केला. लष्कराचे उरी येथील ब्रिगेड मुख्यालय भारत-पाक सीमेला लागून आहे. पहाटे साडे पाच वाजता दहशतवाद्यांने हा भीषण हल्ला केल्याची माहीती पोलिसांनी दिली. पहाटे झालेल्या गोळाबार आणि स्फोटाच्या आवाजानंतर जवानांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे. घटनास्थाळावर मदतीसाठी जवानांचे स्पेशल पथक पाठवण्यात आले आहे.
 
चार दहशतवादी मुख्यालयात घुसले होते. दहशतवादयांनी मुख्यालयाच्या आत प्रवेश केल्यावर दोन - दोनच्या गटात वेगळे झाले आणि त्यांनी मुख्यालयावर अंधाधूंद गोळीबार केला. भारतीय जवानांनी त्यांना चोख प्रतिउत्तर देताना चारही दहशताद्यांना कंठस्थान घातले आहे. यमसदनी पाठवलेले चारही दहशतवादी पाकिस्थानातील असल्याचे वृत्त समोर आले आहे. उरीमधील बाराव्या ब्रिगेडचं मुख्यालय एलओसीपासून नजीक आहे. हीच संधी साधून आत्मघाती हल्लेखोरांनी मुख्यालय वेठीस धरले आहे.
 
या हल्याचे गांभीर्य पाहत गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आपला पुर्वनियोजित परदेश दौरा रद्द पुढे ढकलला आहे. ते रुस आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार होते. गृहमंत्र्यांनी याबाबत दुपारी १२.३० वाजाता आपल्या निवस्थानावर एक विशेष बैठक बोलवली आहे. तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर घटनास्थाळला भेट देणार आहेत.
 
यापुर्वीही दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यात अनेकवेळा लष्करावर हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. लष्कराने वेळोवेळी त्यांना चोख प्रत्यूत्तर देत दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलेले आहे.