शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मिरातील 17 मंदिरे आणि धार्म स्थळांचा कायापालट होणार, जीर्णोद्धारासाठी ₹17 कोटी खर्च करणार सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 21:52 IST

जम्मू-काश्मीर सरकारने एकूण 71 धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे, ज्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी अंदाजे 420 कोटी रुपये एवढा खर्च येणार असून हा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरचा समृद्ध धार्मिक वारसा जतन करण्यासाठी सरकारने काश्मीरमधील जवळपास सर्वच मोठ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात 17 मंदिरे आणि धार्मिक स्थळांच्या नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येणार असून, यासाठी 17 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या धार्मिक स्थळांमध्ये काही ठिकाणे अशीही आहेत ज्यांना तीर्थ नव्हे तर तीर्थराज म्हटले जाते. यांच्यासोबत काश्मिरी पंडितांची मुळे जोडली गेलेली आहेत. जम्मू आणि काश्मीर सरकारचा पुरातत्व विभाग संबंधित जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली या मंदिरांचा आणि तीर्थक्षेत्रांचा जीर्णोद्धार करून घेईल. या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीर सरकारने एकूण 71 धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे, ज्यांचे नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी अंदाजे 420 कोटी रुपये एवढा खर्च येणार असून हा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या मंदिरांचा होणार जीर्णोद्धार - पहिल्या टप्प्यात ज्या मंदिरांचा आणि धार्मिक स्थळांचा जीर्णोद्धार केला जाणार त्यांत, "पहलगामचे प्राचीन ममलेश्वर मंदिर आणि गौरी शंकर मंदिर, अनंतनाग जिल्ह्यातील अकिंगम येथील ऐतिहासिक शिव भगवती मंदिर, सालिया येथील पापरण नाग मंदिर, खीरम येथील माता रागन्या भगवती मंदीर, अनंतनाग येथील लोगरीपोरा, अश्मुकाम येथील खीर ​​भवानी मंदिर, सालिया येथील करकुट नाग मंदिर. पुलवामतील गुफकराल त्राल, द्रंगबल पंपोर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर, जे वार्षिक अमरनाथ यात्रेसाठी महत्त्वाचे आहे. याशिवाय इतरही अनेक छोटी मंदिरे आहेत ज्यांचा जीर्णोद्धार केला जाणार आहे.

याशिवाय, लारकीपोरा येथील 'तीर्थराज', लोकभवन मंदिर कश्मिरातील अशांततेदरम्यान पूर्ण पणे नष्ट झाले होते. याच्यासाठी 3.21 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. काश्मिरी पंडितांसाठी हे ठिकाण अत्यंत महत्वाचे मानले जाते. 

यासंदर्भात बोलताना ऑल जेके मायग्रंट (काश्मीर युनिट) पंडित असोसिएशनचे अध्यक्ष संजय कौल म्हणाले, 'याचा मोठा इतिहास आहे. हे तीर्थांचे तीर्थ आहे. तीर्थराज लोकभवन जेथे खुद्द शेषनागाचे रुपात आहे, तेथे सिद्ध लक्ष्मी विराजमान आहे. तेथे महाकाल भैरव आहे. तसेच, या कार्यासाठी आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे आभारी आहोत. हा आपला वारसा आहे आणि आपला वारसा आहे, तर आपण आहोत, असेही कौल यावेळी म्हणाले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTempleमंदिरGovernmentसरकार