शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवीन मोबाईलची खरेदी अन् आयुष्याचा शेवट! मित्रांनीच केला घात, पार्टी न दिल्याने तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:02 IST

आजच्या धावपळीच्या जगात मोबाईल म्हणजे सर्वांची अत्यावश्यक वस्तू बनली आहे.

आजच्या धावपळीच्या जगात मोबाईल म्हणजे सर्वांची अत्यावश्यक वस्तू बनली आहे. लहानग्यांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच मोबाईलने आपले वेड लावले आहे. मोबाईलचा जास्त वापर केल्यास त्याचे दुष्परिणामही होतात. दिवसेंदिवस बाजारात महागडे आणि तितकेच आकर्षित करणारे फोन येत आहेत. दिल्लीतील एका तरुणाने अशाच एका नवीन फोनची खरेदी केली पण मित्रांना पार्टी न दिल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. येथील शकरपूर मार्केटमध्ये सोमवारी सायंकाळी उशीरा एका अल्पवयीन मुलाची त्याच्या मित्रांनी हत्या केली. अल्पवयीन मुलाने मोबाईल खरेदी केल्यानंतर मित्रांना पार्टी न दिल्याने त्याची हत्या करण्यात आली. सचिन असे १६ वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे.

माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. शकरपूर पोलीस ठाण्यात खुनासह अनेक कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपींची ओळख पटली असून तेही अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत सचिन हा आपल्या कुटुंबासह शकरपूर परिसरात राहत होता. तो येथील सरकारी शाळेत नववीत शिकत होता. घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, तिघांनी धावत जाऊन अल्पवयीन मुलावर चाकूने हल्ला केला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अल्पवयीन मुलाने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाला आणि आपल्या मित्राला रक्तबंबाळ अवस्थेत पाहून आरोपींनी तिथून पळ काढला. स्थानिकांनी मृत अल्पवयीन मुलाला ऑटोने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा मोबाईल घेण्यासाठी मित्रासोबत शकरपूर मार्केटमध्ये गेला होता. खरेदी करून तो घरी परतत होता. रामजी समोसा विक्रेत्याकडे पोहोचल्यावर त्याला त्याचे आणखी तीन मित्र भेटले आणि त्यांनी पार्टीसाठी आग्रह केला. सचिनने पार्टी देण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात वादावादी झाली. मग सचिनच्या मित्रांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला.

टॅग्स :delhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीMobileमोबाइल