शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गासाठी १६ हजार ५८२ कोटी मंजूर रक्षा खडसे व ए.टी. पाटील यांची माहिती: २५ जानेवारी रोजी नितीन गडकरी करणार कामांचा शुभारंभ

By admin | Updated: January 11, 2016 00:23 IST

महामार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून १६ हजार ५८२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

जळगाव: जिल्‘ातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून १६ हजार ५८२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात काही राज्य मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले आहे. या कामांचा शुभारंभ २५ जानेवारी रोजी केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे व ए.टी.पाटील यांनी रविवारी दिली.सागर पार्कवर होणार सभाभाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व सरचिटणीस दीपक फालक आदी उपस्थित होते. या कामांच्या शुभारंभांसाठी सागर पार्कवर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आल्याचे यावेळी खासदारांनी सांगितले. राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतरपहूर, बोदवड, मुक्ताईनगर, बर्‍हाणपूर, अंकलेश्वर, सिल्लोड, औरंगाबाद आदी राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे.शहरात तीन ठिकाणी उड्डाणपूलया निधीतूनच जळगाव शहरातून जाणार्‍या रस्त्यावर बांभोरी ते नशिराबाद नाक्यापर्यंत १७ कि.मी.च्या अंतरात तीन उड्डाणपुल उभारण्यात येणारआहेत. कालिंका माता ते अजिंठा चौक, इच्छादेवी ते आकाशवाणी चौक व बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी हे उड्डाणपुल असतील. त्यासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत,अशी माहिती खासदारांनी दिली. 

भुसावळला प्लॉस्टिक पार्कजिल्‘ातील प्लास्टीक उद्योगाला चालना देण्यासाठी भुसावळला एमआयडीसीत प्लॉस्टिक पार्कचाही प्रस्ताव आहे. हे काम अंतिम टप्यात आले आहे. केंद्र सरकारने देशात अहमदाबाद, वाराणसी व जळगाव अशी तीन जिल्‘ांची निवड केली आहे. टेक्सटाईल्स पार्क हा जामनेर तालुक्यातच होणार असल्याचा पुनरुच्चार खासदारांनी केला.असा आहे मार्ग व निधीपहूर, जामनेर,बोदवड, मुक्ताईनगर,बर्‍हाणपूर या ७५ कि.मी.रस्त्यासाठी ७५० कोटी रुपये, नांदुरा-बर्‍हाणपूर या महाराष्ट्र सिमेला जोडणार्‍या १४५ कि.मी.च्या रस्त्यासाठी १४५० कोटी, इंदूर, बर्‍हाणपूर, पिंप्री, मुक्ताईनगर या ४०१ कि.मी.साठी ३२६० कोटी, बोदवड, जामनेर, पहुर, अजिंठा, सिल्लोड, औरंगाबाद ४०१ कि.मी.च्या मार्गासाठी ३२६० कोटी, औरंगाबाद, फुलंब्री,जळगाव या १५५ कि.मी.साठी ४००० कोटी,बर्‍हाणपूर, रावेर,चोपडा, शिरपूर, सावदा, नंदुरबार, देडीपाडा, अंकलेश्वर या ५५५ कि.मी.साठी ४३५० यासह राष्ट्रीय महागार्ग २११ औरंगाबाद, चाळीसगाव ,धुळे या १५३ कि.मी.साठी २१७६ कोटी, चाळीसगाव घाटात १४ कि.मी. रस्ते व रेल्वेचा संयुक्त प्रकल्पासाठी १७५० कोटी रुपये मंजूर झाले असल्याचीमाहितीखासदारांनीदिली.